IMPIMP

Manisha Kayande | ‘अमृता फडणवीसांना सध्या कोणतेही काम नाही, BJP ने त्यांची प्रवक्तेपदी निवड करावी’

by nagesh
Manisha Kayande | shiv sena leader manisha kayande has criticized amrita fadnavis

मुंबई न्यूज (Mumbai News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)–  Manisha Kayande | धागा हॅन्डलूम महोत्सवाचं गुरुवारी पुण्यात (Pune) आयोजन करण्यात आलं होतं. उद्घाटन कार्यक्रमावेळी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या उपस्थित होत्या. अमृता फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम पार पडला. नंतर त्यांनी पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर भाष्य केलं. तसेच त्यावेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. दरम्यान, पुण्यातील निर्बंधाबाबत देखील त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. यांच्या टीकेनंतर आता प्रत्युत्तराला शिवसेनेनीही (Manisha Kayande) उडी घेतली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis ) यांना प्रत्युत्तर देत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्यावेळी मनिषा कायंदे म्हणाल्या की, ‘अमृता फडणवीस पुण्याला फिरायला गेल्या होत्या. तिथे त्यांनी नेहमीप्रमाणे राजकीय वक्तव्य केलं आहे. सध्या त्यांच्याकडे कोणतेही काम नाही. त्यामुळे भाजपाने त्यांची प्रवक्तेपदी निवड करावी, असा जोरदार टोला देखील मनिषा कायंदे यांनी लगावला आहे.

 

दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी देखील अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ‘कोण अमृता फडणवीस? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी का? नावडतीचं मिठ अळणी, अशी त्यांची अवस्था झाली आहे. अशी टीका शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस यांच्यावर केली आहे.

 

 

Web Title : Manisha Kayande | shiv sena leader manisha kayande has criticized amrita fadnavis

 

हे देखील वाचा :

Pune Rural Police | लातूर ते मुंबई एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटणार्‍या तिघांना पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक; तब्बल 1 कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune lockdown | कोरोनाच्या निर्बंधामुळे पुण्यात दररोज 50 कोटींचे नुकसान?

Pune Rain | यंदाच्या पावसाने पुणे शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

 

Related Posts