IMPIMP

Pune lockdown | कोरोनाच्या निर्बंधामुळे पुण्यात दररोज 50 कोटींचे नुकसान?

by nagesh
Restrictions in Maharashtra | maharashtra deputy chief minister ajit pawar holds meeting with task force on maharashtra Restrictions

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Pune lockdown | पुणे शहरातील (Pune) रोज सुमारे 100 कोटी रुपयांची होणारी विक्रीची उलाढाल आता कमी झाली आहे. कोरोनाच्या (Corona virus) पार्श्वभूमीवर मागील 3 महिन्यापासून पुणे निर्बंधाच्या (Pune Lockdown) पट्यात आहे. विशेष म्हणजे पुणे शहरातील कोरोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र निर्बंध जैसे थे’ असल्याने पुणेकरात निराशा दिसून येत आहे. खरंतर शहरातील व्यावसायिक निर्बंधामुळे मेटाकुटीला आले आहेत. निर्बंधांचा फटका आर्थिक घडामोडीवर पडला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pune and Pimpri Chinchwad) शहरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. पुणे शहराचा आणि पिंपरीचा पॉझिटिव्हिटी रेट (Positivity rate) 5 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. व्यवसाय आणि प्रशासकीयदृष्ट्या पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हा हे तिन्ही वेगवेगळे घटक आहेत. मात्र, राज्यस्तरावर पुण्याचा एकत्रित विचार होत असल्यामुळे शहरावर अन्याय होत असल्याची नागरिकांची भावना आहे. म्हणून पुण्यातील व्यापाऱ्यांनी निर्बंध डावलून सायंकाळी 4 नंतरही व्यवसाय सुरू ठेवण्यास प्रारंभ केला आहे. मुंबईला शासनाकडून मुभा देण्यात आली आहे, मात्र पुणे शहराला का नाही? असा प्रश्न पुणेकर व्यक्त करताना दिसत आहेत.

 

पुण्यात सुमारे सव्वा लाख लहान-मोठे व्यावसायिक आहेत. या व्यावसायिकांना मात्र राज्य शासनांनी (State Governments) लागू केलेल्या निर्बंधांचा जोरात फटका बसला आहे. परिणामी पुण्याचा आर्थिक श्वास कोंडला आहे. पुणे व्यापारी महासंघ, हॉटेल्स, मॉल्स असोसिएशननेही निर्बंध शिथिल करण्याबाबत लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडे पाठपुरावा केला. तरी देखील अजून त्यावर तोडगा निघाला नाही. या दरम्यानं शहर भाजप आणि शहर काँग्रेसने व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या अधिक होती, तेव्हा व्यावसायिकांच्या संघटनांनी राज्य सरकारला सहकार्य केले. मात्र आता तर संख्या घटत आहे. मग यावर निर्णय का नाही? असं व्यावसायिक म्हणत आहेत.

 

Web Title :- pune lockdown effect pune financial situation worst all businessman’s are in trouble

 

हे देखील वाचा :

Pune Rain | यंदाच्या पावसाने पुणे शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

Serum Institute | सीरमकडून महत्त्वपूर्ण घोषणा; कोविशील्ड घेतलेल्या विद्यार्थ्यांचा परदेशातील क्वारंटाईनचा खर्च उचलणार

Rain in Maharashtra | आठवडाभर पाऊस घेणार विश्रांती; हवामान विभागाचा अंदाज

Pavana Dam | पिंपरी चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटली; पवना धरणात 92.81 टक्के पाणीसाठा

 

Related Posts