IMPIMP

Pune Rural Police | लातूर ते मुंबई एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटणार्‍या तिघांना पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक; तब्बल 1 कोटींचा मुद्देमाल जप्त

by nagesh
Pune Rural Police | Pune Rural Police arrested three persons for robbing passengers traveling from Latur to Mumbai ST; Property worth Rs 1 crore seized 

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)–  लातूर ते मुंबई एसटीने (Latur to Mumbai) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पोलीस असल्याची बतावणी करुन 1 कोटी 12 लाख 36 हजार 860 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली होती. ही घटना सोलापूर-पुणे महामार्गावर यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाटस (Patas) येथे 3 ऑगस्ट रोजी घडली होती. या प्रकरणातील तीन आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) अटक (Arrest) केली आहे. त्यांच्याकडून 1 कोटी 54 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) 72 तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

 

रामदास भाऊसाहेब भोसले (वय-30 रा. वरुडे, ता. शिरुर), तुषार बबन तांबे (वय-22 रा. वरुडे, ता. शिरुर), भरत शहाजी बांगर (वय-36 रा. गणेगाव खालसा, ता. शिरुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी हितेंद्र बाळासाहेब जाधव (रा. वाघोशी, ता. फलटण जि. सातारा) यांनी यवत पोलीस ठाण्यात (Yavat police station) फिर्याद दिली होती.

 

स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु असताना तांत्रिक विश्लेषणावरुन आरोपींची माहिती मिळाली.
या गुन्ह्यातील आरोपी रामदास भोसले हा खराडी बायबास (Kharadi bypass) येथे असून तो
साथीदारांसह पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खराडी
बायपास येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी तुषार तांबे याच्याकडून 1 लाख 50
हजार तर भरत बांगर याच्याकाडून 30 हजार रुपये जप्त केले. तसेच रामदास भोसले याने उसाच्या शेतात लपवून ठेवलेले 91 लाख 3 हजार 40 रुपये व सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार, बुलेट ज्युपिटर असा एकूण 1 लाख 54 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

गुन्हा घडल्यापासून 72 तासात आरोपींच्या मुसक्या आवळ्यात पोलिसांना यश आले. अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी भरत बांगर हा रामादास भोसले याच्या बहिणीचा पती आहे. या गुन्ह्यात आणखी आरोपींचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील (Police Inspector Bhausaheb Patil) हे करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (Superintendent of Police Dr. Abhinav Deshmukh), अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते (Additional
Superintendent of Police Milind Mohite), उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल धस
(Deputy Divisional Police Officer Rahul Dhas) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे
शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट (Police Inspector Padmakar Ghanwat),
सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे (API Sachin Kale), पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे
(PSI Shivaji Nanavare), सहायक फौजदार पंधारे, शब्बीर पठाण, पोलीस हवालदार राजू
मोमीन, जनार्दन शेळके, अनिल काळे, रविराज कोकरे, पोलीस नाईक अजित भुजबळ, मंगेश थिगळे, विजय कांचन, गुरु जाधव, धिरज जाधव, बाळासाहेब खडके, चालक पोलीस कॉन्स्टेबल दगडू विरकर, काशीनाथ राजापुरे यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Rural Police | Pune Rural Police arrested three persons for robbing passengers traveling from Latur to Mumbai ST; Property worth Rs 1 crore seized

 

हे देखील वाचा :

Pune lockdown | कोरोनाच्या निर्बंधामुळे पुण्यात दररोज 50 कोटींचे नुकसान?

Pune Rain | यंदाच्या पावसाने पुणे शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

Serum Institute | सीरमकडून महत्त्वपूर्ण घोषणा; कोविशील्ड घेतलेल्या विद्यार्थ्यांचा परदेशातील क्वारंटाईनचा खर्च उचलणार

Rain in Maharashtra | आठवडाभर पाऊस घेणार विश्रांती; हवामान विभागाचा अंदाज

 

Related Posts