IMPIMP

Pune Rain | यंदाच्या पावसाने पुणे शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

by nagesh
Pune Municipal Corporation (PMC) | action against pune and pimpri chinchwad municipal corporations pollution ujani dam frozen PMC PCMC

पुणे न्यूज (Pune News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)  यंदाच्या पावसाने पुण्यासहीत राज्यात जोरदार पावसाने (Pune Rain) वर्णी केली आहे. यामुळे सर्वत्र पाण्याचा साठा मुबलक आहे. पुणे जिल्ह्यात (Pune District) धरणांच्या (Dam) पाणलोट क्षेत्रात (Watershed area) यंदाचा पाऊस (Rain) समाधानकारक रित्या झाल्याने काल (गुरुवारी) पानशेत सहित 5 धरणे पूर्ण भरली गेली आहेत. तसेच, अन्य 6 धरणात 92 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. यामुळे ते भरण्याच्या अवस्थेत आहे. दरम्यान, खडकवासला प्रकल्पातील (Khadakwasala Project) 4 धरणात 27.59 अब्ज घनफूट (TMC) पाणीसाठा झाल्याने पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुळ्याचे चित्र आहे.

आज (शुक्रवारी) खडकवासला (Khadakwasala ) धरणात सायंकाळ अखेर 27.59 (TMC) (94.64 %) पाणीसाठा झालाय. गेल्या वर्षी 5 ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पर्यंत खडकवासला प्रकल्पात 12.07 (TMC) एवढा पाणीसाठा होता. पुणे जिल्ह्यातील जवळ जवळ पानशेत, खडकवासला, कळमोडी, चासकमान आणि आंद्रा हे 5 धरणे पूर्ण भरली आहेत. दरम्यान, खडकवासला धरणातून उजवा मुठा कालव्याच्या माध्यमातून 1 हजार 155 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. तर, येथे खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आज दिवसभर तुरळक पाऊस झाल्याची नोंद आहे.

या दरम्यान, टेमघर धरणाच्या (Department of Water Resources) पाणलोट क्षेत्रामध्ये 5 मिलिमीटर, वरसगाव 4 मिमी, पानशेत 3 मिमी आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 1 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणामध्ये सध्या 30.80 TMC (57.50 %) इतका पाणीसाठा झालाय याबाबत माहिती जलसंपदा विभागाने (Department of Water Resources) दिली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

सोमवारी सायंकाळपर्यंतचा उपयुक्त पाणीसाठा (TMC मध्ये) आणि कंसात टक्केवारी –

खडकवासला 1.93 (97.60)

वरसगाव 11.99 (93.49)

टेमघर 3.06 TMC, (82.52 टक्के )

पवना 7.85 (92.28)

पानशेत 10.62 (99.71)

कळमोडी 1.51 (100)

गुंजवणी 3.40 (92.29)

चासकमान 7.57 (100)

आंद्रा 2.92 (100)

भाटघर 19.76 (84.08)

मुळशी 17.09 (84.78)

वीर 9.24 (98.21)

भामा आसखेड 6.57 (85.69)

नीरा देवघर 11.65 (99.36)

 

Web Title : Pune Rain | problem of drinking water of pune city solved all dam are overflow

 

हे देखील वाचा :

Serum Institute | सीरमकडून महत्त्वपूर्ण घोषणा; कोविशील्ड घेतलेल्या विद्यार्थ्यांचा परदेशातील क्वारंटाईनचा खर्च उचलणार

Rain in Maharashtra | आठवडाभर पाऊस घेणार विश्रांती; हवामान विभागाचा अंदाज

Pavana Dam | पिंपरी चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटली; पवना धरणात 92.81 टक्के पाणीसाठा

Supreme Court | त्रास देणे हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नाही

 

Related Posts