IMPIMP

Maharashtra Lockdown : आपले ‘कार्यक्षम’ मुख्यमंत्री म्हणत गोपीचंद पडळकर म्हणाले… (व्हिडीओ)

by nagesh
Gopichand Padalkar On Thackeray Government | mahavikas aghadi conspiracy to deprive obc of political representation allegation of bjp leader gopichand padalkar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – केंद्र सरकारने 18 वर्षापुढील सर्वांना लस देण्याची परवानगी दिल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकार निर्णय घेईल अशी अपेक्षा भाजप आमदार गोपीचंद पडळकर gopichand padalkar यांनी व्यक्त केली आहे. पडळकर यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, महाराष्ट्र कधी थांबला ना कधी थांबणार याच भूमिकेतून 18 वर्षावरील तरुणांचे मोफत लसीकरण करु असे मुख्यमंत्री आज रात्री जाहिर करतील. तसेच लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय निवडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

राज्यात कोरोना संसर्ग वेगाने वाढत असल्याने 15 दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अनेक मंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर काही तासातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित केले. तसेच सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचे सांगितले. यावरुन आता राजकारण पेटले आहे. तसेच उत्तर प्रदेश सरकारने 18 वर्षावरील सर्व तरुणांना मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्याचा संदर्भ देत गोपीचंद पडळकर gopichand padalkar यांनी राज्यातील ठाकरे सरकारला सल्ला दिला आहे.

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

पडळकर gopichand padalkar यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, उत्तर प्रदेश आणि आसाम राज्यांनी 18 वर्षांवरील सर्वांसाठी मोफत लसीकरण मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र कधी थांबलाय ना कधी थांबणार याच भूमिकेतून आणि पंतप्रधान मोदी यांनी सुचवल्याप्रमाणे मुख्यमंत्री लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून निवडतील. आज संध्याकाळी आपले ‘कार्यक्षम’ मुख्यमंत्री फेसबुक लाईव्हमधून 18 वर्षावरील सर्वांच्या मोफत लसीकरणाचा निर्णय जाहीर करतील, अशी तमाम महाराष्ट्राला अपेक्षा आहे, असे पडळकर यांनी म्हटले.

Also Read :

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

Related Posts