IMPIMP

वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदासाठी ‘या’ आमदारांच्या नावाची चर्चा !

by sikandershaikh
mla-sanjay-raimulkarand-mla-ashish-jaiswa

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)sanjay raimulkar | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण (Pooja Chavan Suicide Case) मध्ये आरोप झाल्यानंतर शिवेसनेचे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर आता त्यांच्याजागी मंत्रिपदासाठी विदर्भातील काही आमदारांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. विदर्भातून आमदार डॉ. संजय रायमूलकर व आशिष जयस्वाल यांची नावं सध्या मंत्रिपदासाठी चर्चेत असल्याचं दिसत आहे.

अनेक ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर रोज अनेक नवनवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. यामुळं महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचा राजीनाम्यासाठीचा सेनेवरील दबाव वाढत होता. अशी माहिती सूत्रांनी दिली होती. इतकंच नाही तर पक्षाची बदनामी होत असल्यानंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज होते. दुसरीकडे आक्रमक झालेल्या भाजपनं देखील त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. अधिवेशनापूर्वी विरोधकांचा गदारोळ टाळण्यासाठी सरकारनं ही खेळी करत रविवारी (दि 28 फेब्रुवारी) राठोडांचा राजीनामा घेतला.

विदर्भाबद्दल बोलायचं झालं तर शिवसेनेचे 4 आमदार निवडून आले आहेत.
आता राठोडांच्या राजीनाम्यानंतर 3 टर्मपासून आमदार असलेले डॉ. रायमूलकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
रायमूलकर यांच्या नावावर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 निवडणुकीत सलग चढत्या मताधिक्यानं विजयी होण्याचा विक्रम आहे.
गेल्या 30 वर्षांपासन मेहकर हा शिवसेनेचा गड म्हणून कायम आहे.
बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेचे 2 आमदार आहे. पक्ष संघटनही मजबूत आहे.
त्यामुळं बुलढाणा जिल्ह्यात मंत्रिपद मिळेल अशी आशा व्यक्त केली जात होती.
3 पक्षांच्या सत्तेत मंत्रिपदाच्या कमी जागा वाट्याला आल्यानं रायमूलकर यांना पंचायत राज समितीचे प्रमुख म्हणून अलीकडेच जबाबदारी देण्यात आली होती.

राठोड यांच्या राजीनाम्यानंतर आता रायमूलकर (sanjay raimulkar), जयस्वाल यांची वर्णी लागते की,
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या येत्या काळातील रंगत पाहता त्या भागात मंत्रिपद जातं हे आता आगामी काळात स्पष्ट होईल.

Related Posts