IMPIMP

MNS Writes To HM Amit Shah On Masjid Loudspeaker | मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसेनं उचलंलं मोठं पाऊल; थेट अमित शहांना पत्र लिहित केली ‘ही’ मागणी !

by nagesh
Union Home Minister Amit Shah | bjp will dominate mumbai politics says union home minister amit shah hit back shivsena chief uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MNS Writes To HM Amit Shah On Masjid Loudspeaker | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात (Loudspeaker) आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांनी घेतलेल्या दोन्ही सभांमध्ये मशिदीच्या भोंग्यावरून राज्य सरकारला इशारा दिला होता. आताही त्यांनी राज्य सरकारला 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं दिसून आलं आहे. आज पुण्यात (Pune) राज ठाकरे संध्याकाळी हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करणार आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीही प्रत्युत्तर म्हणून मुस्लिम नागरिकांना इफ्तारमध्ये (Iftar) हनुमानाचा प्रसाद देणार आहेत. मात्र अशातच मनसेने आणखी एक पाऊल उचललं आहे. (MNS Writes To HM Amit Shah On Masjid Loudspeaker)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

भोंगे हटवण्यासाठी मनसेने आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  (Home Minister Amit Shah) यांना पत्र लिहिलं आहे.
या पत्रामध्ये मशिदीवरील भोंगे हटवण्यासोबतच आणखी म्हणजे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशांचं उल्लंघन करणारी भूमिका घेतल्याची तक्रार देखील करण्यात आली आहे.
मनसेच्या नाशिक (MNS Nashik) विभागाकडून हे पत्र अमित शहा यांना पाठवण्यात आलं आहे.

 

राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमला धार्मिक रंग देत राज्यातील इतर नेते चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत.
मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन होण्याबाबत आता केंद्र सरकारने पुढाकार घेत राज्य सरकारला निर्देश देऊन राज्यातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावं,
अशी मागणी या पत्रातून मनसेने केंद्र सरकारला केली आहे.

 

दरम्यान, आता मनसेने केंद्र सरकारला पाठवलेल्या या पत्रानंतर केंद्र सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- MNS Writes To HM Amit Shah On Masjid Loudspeaker | mns writes to home minister amit shah on masjid loudspeaker hanuman chalisa

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | प्रेमप्रकरणातून 7 अल्पवयीन मित्रांनी केले मित्राचे अपहरण, दगडाने ठेचून केला निर्घृण खून

Kolhapur North By Election Result 2022 | कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीत काँग्रेसच्या जयश्री जाधवांचा विजय; भाजपच्या सत्यजीत कदम यांचा मोठा पराभव

PPF Investment | ‘हा’ आहे सुरक्षित गुंतवणूकीचा मार्ग; बँक व पोस्ट ऑफिसपेक्षा मिळेल जास्त परतावा, जाणून घ्या

 

Related Posts