IMPIMP

खा. नवनीत राणा अॅक्शन मोडमध्ये, अरविंद सावंत यांच्याविरुद्ध FIR दाखल करणार

by pranjalishirish
mp navneet rana warned to shiv sena mp arvind sawant

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाइन-  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री यांच्यावर खंडणीचा गंभीर आरोप केल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. खासदार नवनीत राणा Navneet Rana  यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप केला आहे. नवनीत राणा यांनी आरोप केल्यानंतर अरविंद सावंत यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. मात्र, आता नवनीत राणा यांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्या अरविंद सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहेत, अशी माहिती नवनीत राणा यांनी दिली आहे.

रोहित पवारांनी भाजपला घेरलं !

सोमवारी लोकसभेत सचिन वाझे आणि 100 कोटींच्या वसुलीच्या मुद्यावर बोलताना नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला संसदेच्या लॉबीमध्ये कारागृहात टाकण्याची धमकी दिली, असा आरोप नवनीत राणा Navneet Rana यांनी केला.

‘दर महिन्याला राष्ट्रपती राजवटीची मागणी, त्यात नवीन काय’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा भाजपला टोला

नवनीत राणा यांच्या आरोपानंतर खासदार अरविंद सावंत यांनी आपल्यावर केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे सांगतीतले. तसेच नवनीत राणा यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. मात्र, आता नवनीत राणा Navneet Rana यांनी गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना नवनीत राणा यांनी म्हटले की, आपण आता तक्रार करणार (शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्याविरुद्ध) आहे.

नवनीत राणांची काय आहे तक्रार ?

खासदार नवनीत राणा  Navneet Rana यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. नवनीत राणा यांनी पत्रात लिहले आहे की, महाराष्ट्रात सुरु असलेलं मनसुख हिरेन हत्या प्रकरण, सचिन वाझे प्रकरण तसेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लिहिलेल्या पत्रावरुन ठाकरे सरकारच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तेच प्रश्न मी संसदेत उपस्थित केले. एक महिला खासदार होण्याच्या नात्याने महाराष्ट्रात बिघडत असलेल्या कायदा-सुव्यवस्थेबाबत ठाकरे सरकारविरोधात संसदेत आवाज उठवला. त्यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेच्या लॉबीमध्ये मला धमकी दिली. तू महाराष्ट्रात कशी फिरते मी पाहतो. तुलाही जेलमध्ये टाकू, अशा शब्दात धमकावले. तसेच यापूर्वी शिवसेनेच्या लेटरहेडवर, फोनवर माझ्या चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, असे नवनीत राणा यांनी पत्रात म्हटले आहे.

त्या’ 100 कोटींमध्ये प्रत्येकाचा वाटा?, भाजप आमदाराचा गंभीर आरोप

Also Read :

पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटवरुन फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले- ‘मी आजच केंद्रीय गृहसचिवांना भेटतोय’

‘शरद पवारांच्या तोंडून चुकीच्या गोष्टी वदवून घेतल्या’, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

मोठ्या शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ ची शक्यता ?

वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

‘मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत !’ रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Related Posts