IMPIMP

MP Sanjay Raut | ‘तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आला, आम्ही काही बोललो का? राऊतांचा पलटवार

by bali123
MP sanjay raut reaction on to chandrakant patil bmc election challenge

नवी दिल्ली : वृत्तसंस्था MP Sanjay Raut | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एक आव्हान करत ‘एकदा संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी मुंबई महापालिकेत (BMC) एक सेफ जागा निवडणूक (Election) लढून जिंकून येऊन दाखवावं, असं म्हटलं होतं चंद्रकांत पाटलांच्या या प्रश्नाला आता शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. तुम्ही कोल्हापूर (Kolhapur) सोडून कोथरुडला (Kothrud) आला, आम्ही काही बोललो का?, अशा शब्दात टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

संजय राऊत बोलताना म्हणाले की, ‘मी काय करावं हा प्रश्न येतो कुठे? त्यांनी त्यांचं पाहावं. माझ्याकडून त्रास होत आहे मान्य आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी पाटील यांच्यावर खोचक टिपणी केली आहे. माझ्या पक्षाने मला जी जबाबदारी दिली तिकडे मी असणार आणि ती जबाबदारी नेटाने पार पाडणार, आहे असे ते म्हणाले. दरम्यान, तुम्ही विधानसभा निवडणुकीला कोल्हापूर सोडून कोथरुडला आले. आम्ही तुम्हाला काही बोललो का? असं प्रत्युत्तर संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी दिलं आहे.

 

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राऊतांना निवडणूक लढण्याचं चॅलेंज दिलं आहे. जर एकदा संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेत एक सेफ जागा निवडणूक लढून जिंकून येऊन दाखवावे त्यांनी त्यांचे दंड ही थोपटून पहावे आणि ताकद ही पाहावी, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.

Web Title : MP sanjay raut reaction on to chandrakant patil bmc election challenge

 

हे देखील वाचा :

Crime News | कलयुग ! पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने घेतली अग्निपरीक्षा, हातावर जाळला कापूर विश्वास न बसल्याने पाजले विष

Sawan Somvar | महादेवाची पूजा करण्यासाठी बेलाच्या पानाचं महत्व काय? जाणून घ्या महत्व

Raj Kundra Porn Film Case | पॉर्न प्रकरणी पोलीस कोठडीला आव्हान देणारी राज कुंद्राची याचिका फेटाळली

Related Posts