IMPIMP

MP Sanjay Raut | खा. संजय राऊतांचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा, म्हणाले…

by bali123
MP Sanjay Raut | shiv sena mp sanjay raut indirectly threaten bjp over ed and cbi inquiry of anil deshmukh

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MP Sanjay Raut | केंद्रातील भाजप सरकार (BJP Government) जाणीवपूर्वक राज्यातील महाविकास आघाडीचे नेते (MVA Leader) व मंत्र्यांना त्रास देत असल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी अन् शिवसेना नेत्यांनी (Congress, NCP, Shiv Sena,) केला आहे. मात्र, विरोधकांच्या आरोपांनंतरही ईडी, सीबीआयचे (ED and CBI) छापे सुरूच आहेत. कालच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्या घरावर दुसऱ्यांदा छापा टाकण्यात आला. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राज्यातील नेते, मंत्र्यांवर काही आरोप असतील तर राज्यातील तपास यंत्रणा चौकशी करण्यास सक्षम आहे. पण महाराष्ट्रातील मंत्र्यांना, मग ते सेनेचे असोत राष्ट्रवादीचे असोत की काँग्रेसचे, त्यांना ठरवून त्रास दिला जात आहे. पण आम्ही बघून घेऊ असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. MP Sanjay Raut | shiv sena mp sanjay raut indirectly threaten bjp over ed and cbi inquiry of anil deshmukh

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी हप्ता वसुलीचे टार्गेट दिले होते.
असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग (Param Bir Singh) यांनी केला होता.
या आरोपानंतर काही दिवसांपूर्वी ईडीने देशमुख यांच्या घरी छापे टाकले होते.
काल पुन्हा एकदा तशीच कारवाई केली.
देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांनाही अटक झाली आहे.
तसेच देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) प्रचंड अस्वस्थता आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Saranaik) यांचीही सध्या ईडी चौकशी सुरू आहे.
तर, खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांची चौकशी झाली आहे.

Web Title :- MP Sanjay Raut | shiv sena mp sanjay raut indirectly threaten bjp over ed and cbi inquiry of anil deshmukh

Related Posts