IMPIMP

MP Sanjay Raut । पिंपरी-चिंचवड महापालिकेत सेनेचाच महापौर होणार; संजय राऊत म्हणाले…

by bali123
MP Sanjay Raut | shiv sena mp sanjay raut reaction about uttar pradesh assembly election

पिंपरी- चिंचवड न्यूज (Pimpri-Chinchwad News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या (Pimpri-Chinchwad Municipal Election) तयारीसाठी शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (9 जून) रोजी तीनही विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (Shiv Sena) पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. त्यावेळी राऊत यांनी मोठं भाकीत केलं आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका पुढील निवडणुकीत शिवसेनेचे 50 नगरसेवक निवडून येणार असून महापालिकेत महापौरही (Mayor) सेनेचाच होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सन्मानाने जागा वाटप झाले तरच आघाडी करणार, असं म्हणत राऊत यांनी अप्रत्यक्षपणे स्वबळाची घोषणा केलीय. 56 आमदारांच्या जोरावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होतो, तर 50 नगरसेवकांवर नक्कीच सेनेचा महापौर होणार असल्याच मत राऊत (MP Sanjay Raut) यांनी व्यक्त केलं.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

संजय राऊत (MP Sanjay Raut) यांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला. त्यावेळी बोलताना राऊत म्हणाले, ‘भाजपने भय आणि भ्रष्टाचार मुक्त पिंपरी-चिंचवड अशा घोषणा 5 वर्षापूर्वी दिल्या होत्या. पण, या काळात भय आणि भ्रष्टाचाराचा अंत झाला नाही. यापेक्षा अधिक वाढताना दिसत आहे. भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त पिंपरी-चिंचवड हाच मुद्दा घेऊन शिवसेना महापालिकेची येणारी निवडणूक लढविणार आहे. आम्ही दाखवून देऊ महापालिका कशी चालवायची, शहर कसे ठेवायचे, लोकांना सुरक्षा कशी द्यायची, असं संजय राऊत म्हणाले.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, ‘महापालिकेत भाजपची (BJP) सत्ता आहे. परंतु, त्यांचे अनेक
नगरसेवक राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून गेलेले आहेत. आता हे अर्धे उठून राष्ट्रवादीत जातील. इथे
ओरिजनल पक्ष शिवसेनाच आहे, तर बेडूक उड्यातून भय आणि भ्रष्टाचार मुक्त शहर होणार आहे
का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. या दरम्यान, महापालिकेत जनतेच्या पैशांची लूट होत आहे. भय, भ्रष्टाचारमुक्त घोषणा ही ठेकेदारीची रिंग आहे. दोन्ही आमदारांसह इथले सर्व प्रमुख लोक महापालिकेतील ठेकेदारीमध्ये गुंतले आहेत. परंतु, आता महापालिकेतील भ्रष्टाचाराची सर्व प्रकरणे मंत्रालयापर्यंत पोहोचली आहेत. स्मार्ट सिटीतील भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या कंपनीचा कोट्यावधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आलाय, त्याची तक्रार ED कडे करणार असल्याचं संजय राऊत म्हणाले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

संजय राऊत यांनी अनेक विषयावर त्यावेळी पत्रकारांशी सवांद साधला आहे. पिंपरी-चिंचवड
(Pimpri-Chinchwad) महापालिकेतील भ्रष्टाचार, निवडणुकीतील आघाडी, जागा वाटप
याबाबत शिवसेनेची (Shiv Sena) भूमिका मांडली. खासदार श्रीरंग बारणे, उपनेते रवींद्र मिर्लेकर,
माजी खासदार, उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष
रघुनाथ कुचिक, राज्य संघटक गोविंद घोळवे, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, शहरप्रमुख सचिन
भोसले, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शिवसेना गटनेते राहुल
कलाटे, नगरसेवक अमित गावडे आदी उपस्थित होते.

Web Titel :  MP Sanjay Raut | shiv sena to fight pimpri chinchwad municipal elections on its own says sanjay raut

Related Posts