IMPIMP

MP Supriya Sule | पुण्याच्या महापौरांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘कोणत्याही चौकशीला आम्ही तयार’

by bali123
mp supriya sule murlidhar mohol dumping ground waste management ed cbi inquiry

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन MP Supriya Sule | शहरातील रामटेकडी येथील कचरा प्रकल्पाची (Ramtekdi waste project) सोमवारी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी पाहणी केल्यानंतर कचरा प्रकल्पासाठी २०० कोटी देण्यात आले होते. मात्र त्यातून कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचे दिसत आहे. हा निधी गेला कुठे असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाची सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी (Inquiry through CBI and ED) करण्याची मागणी केली. त्यावर महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले असून आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत असे सांगितले आहे. mp supriya sule murlidhar mohol dumping ground waste management ed cbi inquiry

ट्विटरच्या माध्यमातून मोहोळ यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, पुणे महापालिकेची निवडणूक (Pune Municipal Election) जवळ आली आहे.
त्यामुळे सुप्रिया सुळे यांना पुण्याच्या कचरा प्रश्नांची आठ्वण झाली आहे.
त्यांनी कचऱ्यासाठी झालेल्या खर्चाची ईडी (ED) मार्फत चौकशीची करण्याची मागणी केली आहे.
त्यांची हि मागणी म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणेवर त्यांचा विश्वास आहे हे मी मानतो.
आणि त्यांचं स्वागत करतो. सुप्रिया सुळेंनी हाच विश्वास अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर झालेल्या आरोपांच्या ईडी चौकशी बाबतीतही ठेवावा. सुळेंची खासदारकीची ही तिसरी टर्म आहे.
त्यांचे बंधू अजित पवार यांनी २०१४ पर्यंत आणि २०१९ नंतर सातत्याने पुण्याचे नेतृत्व केले आहे.
तरीही पुण्याचा कचरा प्रश्न सोडवण्यात यश आलेलं नाही, असेच त्यांना म्हणायचे आहे का?,असा सवाल मोहोळ यांनी केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

गेल्या चार वर्षातील कचरा व्यवस्थापनाबाबत आम्ही केलेल्या प्रयत्नांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहेत.
अगदीच अलीकडचेच सांगायचे झाले तर केंद्राने पुण्याच्या वेस्ट मॅनेजमेन्ट दखल घेतली.
आमच्याच काळात कचरा प्रक्रिया करण्यासाठी सहा नवे प्रकल्प झाले.
महापालिकेत भाजपची (BJP) सत्ता आल्यानतर कचरा प्रक्रियेची क्षमता १२०० मेट्रिक टनावरून १८०० मेट्रिक टनापर्यंत वाढवली गेली.
याचीही माहिती सुप्रिया सुळेंनी घ्यावी. अनेक सुरू होणारे प्रकल्प आपल्या पक्षाने तर तोडफोड करून जाळपोळ करून बंद पाडले.
मात्र केवळ महापालिका (Pune Municipal Corporation) निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कचऱ्यावर झालेल्या खर्चाची मागणी करणे म्हणजे सुळे यांनी स्वतःच्याच अपयशावर शिक्कामोर्तब केले आहे,
अशी टीका मुरलीधर मोहोळ यांनी आहे.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) काय म्हणाल्या होत्या?

सोमवारी सुप्रिया सुळे यांनी रामटेकडी येथील कचरा प्रकल्पही पाहणी केली.
त्यावेळी त्या म्हणाल्या, कित्येक वर्षांपासून शहरातील कचरा उरुळी देवाची आणि रामटेकडी येथील कचरा डेपोंमध्ये येत आहे.
इथल्या कचऱ्यावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे. मात्र इथली परिस्थिती पाहता कोणतीही प्रक्रिया करण्यात न आल्याचे दिसत आहे.
परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
कचरा प्रकल्पासाठी वेळोवेळी २०० कोटी रुपये दिले आहेत. पण इथली परिस्थिती पहिली तर निधी गेला कुठे असा प्रश्न निर्माण होतो.
त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची पारदर्शकपणे सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली होती.

Web Title : mp supriya sule murlidhar mohol dumping ground waste management ed cbi inquiry

Related Posts