IMPIMP

Nana Patole | नितीन राऊत-बाळासाहेब थोरात सोनियांच्या भेटीसाठी दिल्लीत, नाना पटोलेंनी दिलं स्पष्टीकरण

by bali123
Nana Patole | nitin raut and balasaheb thorat reached delhi nana patole reaction

पुणे न्यूज (Pune News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Nana Patole | काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत कलह असल्याची चर्चा सुरु असतानाच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. थोरात-राऊत यांच्या दिल्लीवारीबद्दल बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आमच्या पक्षात कोणताही अंतर्गत कलह नाही. दिल्लीत मंत्री त्यांच्या कामानिमित्त जातच असतात. तसेच राऊत आणि थोरात दिल्लीला गेले असावेत, असे नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. Nana Patole | nitin raut and balasaheb thorat reached delhi nana patole reaction

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा

नाना पटोले म्हणाले, अंतर्गत वादाचंच बोलाल तर नुकतंच भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साखर कारखान्यांतील घोटाळ्यांबद्दल केद्रीय गृहमंत्री अमित शहा (HM Amit Shah) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्या कारखान्याचंही नाव घेतलं आहे. ते तुम्ही आधी बघा, असं म्हणत नाना पटोले यांनी भाजपमधील स्थितीबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

स्वबळावर लढण्यावर ठाम

कोरोनाच्या परिस्थितीत दोन दिवसांच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षची निवड करणे शक्य नव्हते. महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्यावर मी ठाम आहे. तथापि स्थानिक नेत्यांशी बोलून चाचपणी केली जाईल. नंतर योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. असे नाना पटोले यांनी सांगितले. आगामी निवडणुका स्वबळावर लवढल्या जातील, असा दावा नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या काही नेत्यांनी स्वबळाचा नारा देणाऱ्या मंत्र्यांची तक्रार दिल्ली दरबारी केल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पटोले यांनी स्वबळाचा निर्धार कायम असल्याचे म्हटले आहे.

पटोले-राऊत यांच्यात वाद

नाना पटोले आणि नितीन राऊत यांच्यातील वाद आता दिल्लीत पोहचले आहेत. पटोलेंशी झालेल्या मतभेदामुळे नितीन राऊत पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी दिल्लीत दाखल झाल आहेत. पटोले आणि राऊत यांच्यात गेल्या काही महिन्यापासून वाद सुरु आहेत. विधानसभा अध्यक्ष काँग्रेसला मिळालं नाही. यावरुन काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

पत्रकार परिषदेतीत प्रमुख मुद्दे

काँग्रेसमध्ये वाद नाही. पुण्यात महापालिका स्वबळावर लढण्याची तयारी सुरु आहे. त्याची चाचपणी सुरु आहे.

भाजप ओबीसी विरोधात आहे. अधिवेशनात जे झालं ते भाजपच्या नेत्यांचं तोल सुटल्यानं.

केंद्रात खातेबदल झाले नवी मंत्री झाले. पण डबे कितीही बदलले तरी काही उपयोग नाही इंजिन बदलणे गरजेचे आहे.

मोदी सरकारने सीबीआय आणि ईडीचं महत्व क्षुल्लक करुन ठेवले आहे.

काँग्रेस केंद्राने बनवलेल्या कृषी कायद्याच्या विरोधातच आहे.

Web Title : Nana Patole | nitin raut and balasaheb thorat reached delhi nana patole reaction

Related Posts