IMPIMP

Chhagan Bhujbal | भाजप नेत्याचा दावा, म्हणाले – ‘मंत्री छगन भुजबळ यांची 100 कोटींची मालमत्ता जप्त’

by nagesh
Chagan Bhujbal | chhagan bhujbal reaction on rahul gandhi savarkar statement

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचा दावा केला गेलाय. अशी माहिती आता समोर आलीय. भाजपचे (BJP) जेष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी याबाबत माहिती ट्विटच्या माध्यमातुन दिली आहे. छगन भुजबळ. माजी खासदार समीर भुजबळ आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या शंभर कोटी (One hundred crores) रुपयांच्या अनामिक मालमत्ता (Anonymous Properties) आयकर विभागाकडून (Income Tax Department) जप्त करण्यात आल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. मात्र यावरून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने जप्त केलेल्या संपत्तीशो माझा संबंध नसल्याचं मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

काय म्हणाले किरीट सोमय्या?

आयकर विभागाने (Income Tax Department) मरीनड्राइव्हच्या अल-जबेरिया कोर्ट ही इमारत बेहिशोबी मालमत्ता म्हणून सील केलीय. या इमारतीची बाजार भावानुसार दर १०० कोटी (One hundred crores) आहे. ज्या कंपनीने या इमारतीची खरेदी केली होती. चौकशी दरम्यान या कंपनीकडे इमारत खरेदी करण्याच्याअंती पुरेसे पैसेही नव्हते. या इमारतीची मंत्री छगन भुजबळ यांच्याविरूद्ध मनी लाँडरिंग प्रकरणात (Money laundering case) सक्तवसुली संचालनालय (ED) ने चौकशीही केली होती. सक्तवसुली संचालनालय (ED) ला महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील पैसे या इमारतीच्या खरेदीसाठी वापरला असल्याचा संशय होता. या प्रकरणी व्यावसायिक अर्शद सिद्धीकी (Arshad Siddhiki) याच्या मार्फत हे पैसे गुंतवल्याचा संशय ED ला होता. यावरून ED कडून त्याचा जबाब देखील नोंदवण्यात आला आहे. अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे.

या दरम्यान, पुढे सांगतांना किरीट सोमय्या म्हणाले की, अर्शद सिद्धीकी (Arshad Siddhiki) आणि भुजबळांचा पुतण्या समीर हे डिसेंबर २०१३ साली कुवेतला गेले होते. कुवेतमध्ये त्यांनी त्या इमारतीचा हक्क असलेल्या राजघराण्यातील व्यक्तींची भेट घेऊन करारावर चर्चा देखील केली होती. याबाबत पुरावे ED ला मिळाले होते. राजघराण्याने अल-जबरिया कोर्ट या इमारतीचा सर्वात वरचा मजला स्वत:साठी ठेवला होता. तर इमारतीतले अन्य फ्लॅट भाड्याने दिले होते, असं त्यांनी सांगितलं आहे.

 

Web Title : Chhagan Bhujbal | minister ncp leaders chhagan bhujbal benami properties of 100 crores sized by income tax

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर

Narayan Rane | नारायण राणेंना जामीन देताना न्यायालयानं नेमकं काय म्हंटलं?

Pune Crime | धक्कादायक ! रक्षाबंधनासाठी घरी आलेल्या अल्पवयीन मुलींचा केला विनयभंग

 

Related Posts