IMPIMP

‘आज जर महाराज असते तर…’, नारायण राणेंची मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर खरमरीत टीका

by pranjalishirish
narayan rane slams uddhav thackeray sanjay raut vaccination shivaji maharaj

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात सध्या कोरोना लसीच्या पुरवठ्यावरुन राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष सुरु आहे. या संघर्षात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. याच मुद्यावरुन आज नारायण राणे  Narayan Rane यांनी मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. सध्या कोरोना प्रतिबंधक लसीवरुन राजकारण सुरु आहे. राज्य सरकार केंद्रावर आगपाखड करत आहेत. तुम्ही केंद्राकडे बोट दाखवू नका. माझं असं स्पष्ट मत आहे की मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र कोरोना रोखायला कमी पडला, अशा शब्दात नरायण राणे यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली.

दिल्लीत बसून महाराष्ट्राची बदनामी करायची, हे कोणतं राजकारण सुरु आहे ?’, संजय राऊतांचा मराठी मंत्र्यांना सवाल

तर महाराजांनी थेट कडेलोट केला असता

नारायण राणे Narayan Rane  म्हणाले, केंद्रातील महाराष्ट्राचे मंत्री राज्याचं नाव बदनाम करत असल्याचा आरोप ठाकरे सरकारचे मंत्री आणि खासदार संजय राऊत करत आहेत. ते उठसूट छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात. आज जर खरंच महाराज असते तर 100 कोटी जमा करायला लावणाऱ्यांचा थेट कडेलोट केला असता. अनिल परब कोणासाठी कलेक्शन करतो हे सर्वांना माहिती आहे. शिवसेनेत कोणतेही पद फुकट मिळत नाही. सचिन वाझे, अनिल परब, अनिल देशमुख आणि त्यांना प्रोत्साहन देऊन भागीदारी घेणारे या साऱ्यांनी राज्य खराब केलं, अशा शब्दात भाजप खासदार नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’

मुख्यमंत्री मातोश्रीबाहेरच पडत नाहीत

नारायण राणे Narayan Rane  पुढे म्हणाले, राज्यात मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र याचे गांभीर्य सरकारला नाही. ते केवळ केंद्राकडे बोट दाखवत आहेत. मुख्यमंत्री म्हणतात की माझं कुटुंब माझी जबाबदारी, तर मग राज्यात डॉक्टर, नर्स, व्हेंटिलेटर बेड्स पुरवणं ही कोणाची जबाबदारी ? कोरोना आल्यावर मुख्यमंत्री पिंजऱ्यात जाऊन का बसतात ? ते मातोश्रीबाहेरच पडत नाहीत. मग त्यांना कोरोना कसा होईल ? ज्यांच्या घरातील सर्व लोक कोरोना बाधित आहेत ते आम्हाला कसं सांभाळणार ? असे प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केले आहेत.

..अन्यथा ‘मराठवाडी’ च्या जलाशयात सत्याग्रह – नरेंद्र पाटील

सरकार गेलं तर माझं काय म्हणून खात सुटलेत

राज्यात एक दिवस पुरेल एवढीच लस शिल्ल्क आहे, असं कसं… हे स्वत:चं अपयश झाकण्याचा प्रकार सुरु आहे. दररोज म्हाडाची प्रकरण समोर येत आहेत. काम न करता पैसे वाटले जात आहेत. उद्या सरकार गेलं तर आमचं काय म्हणून सगळे खात सुटलेत. राज्यासाठी दीड वर्षाची बचत बाहेर काढा आणि बेड, लसीकरणासाठी वापरा. राज्याची आर्थिक स्थिती सांभाळायला किमान पाच वर्षे लागतील, अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दुकानात 3 माणसं होती म्हणून 10 हजार दंड, मग पंढरपुरात…

ते 100 कोटी लसीसाठी वापरा

सचिन वाझे प्रकरणावर भाष्य करताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, तुम्ही सचिन वाझेला मुंबईतून 100 कोटी जमा करायला सांगितले होते. त्यात नक्कीच मुख्यमंत्री पण सहभागी आहेत. हे जमा केलेले पैसे लसीसाठी का वापरत नाही ? असे नारायण राणे म्हणाले.

Read More : 

गोंदिया : नागझिरा अभयारण्यात वणवा विझविताना तीन मजुरांचा होरपळून मृत्यु

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कारवाईचे संकेत, म्हणाले – ‘भिडेंचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी’

MPSC परीक्षेबाबत राज ठाकरेंचा CM उद्धव ठाकरेंना फोन, केली ‘ही’ मागणी

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! CBI कडून तपास सुरु, टीम NIA कार्यालयात दाखल

Gold Price Today : सोनं 250 रुपयांनी तर चांदी 360 रुपयांनी महागली !

जावडेकरांच्या आरोपांना राजेश टोपेंचे प्रत्युत्तर, म्हणाले -‘लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवताय’

Pimpri : ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणाऱ्या आदित्य बिर्ला हॉस्पीटल, लोकमान्य हॉस्पीटल अन् डॉ. डी.वाय हॉस्पीटलला कारणे दाखवा नोटीस

Lockdown चा कालावधी एक आठवड्यांनी वाढणार ? सरकार संपूर्ण लॉकडाऊन करण्याच्या तयारीत ?

Pune : जमलेल्या लग्नाला कोरोनाची आडकाठी, खऱेदीअभावी लग्न पुढे ढकलले

Related Posts