IMPIMP

माथाडी नेते नरेंद्र पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र, CM ठाकरेंवर केले ‘हे’ आरोप

by pranjalishirish
narendra patil mathadi labor leader narendra patil leaves shiv sena made serious allegations against shivsena and uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात वेगवेगळ्या मुद्यांवरुन सातत्याने आरोप होत असल्याने ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. तर दुसरीकडे आज शिवसेनेच्या एका बड्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील Narendra Patil यांनी आज शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत असल्याची घोषणा केली. पक्षाला सोडचिठ्ठी देताना नरेंद्र पाटील यांनी पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

Girish Bapat : ‘पवारांनी कितीही प्रयत्न केला तरी सत्य समोर येणार अन् ‘दूध का दूध’, ‘पानी का पानी’ होणार’

नरेंद्र पाटील Narendra Patil  यांनी पक्षसोडताना म्हटले की, मी पक्षात राहू नये असे काही नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे मी आज पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे पाटील यांनी सांगितले. माथाडी कामगार नेते आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात नरेंद्र पाटील यांनी आपण शिवसेनेला सोडचिठ्ठी देत असल्याची घोषणा केली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन दीड वर्षे झाली तरी देखील अद्याप मुख्यमंत्र्यांनी माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवले नाहीत. माथीडी प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी वेळ मागून देखील वेळ दिली जात नाही, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नरेंद्र पाटील यांनी केला.

‘महाविकास आघाडी ही शिवसेनेची राजकीय मजबुरी’, संजय राऊतांचे मोठं विधान

नरेंद्र पाटील Narendra Patil यांनी सांगितले की, माझे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यामध्ये चांगले संबंध आहे. हेच संबंध शिवसेनेच्या नेत्यांना खूपत आहेत. तसेच शिवसेनेच्या नेत्यांना मी पक्षात राहू नये असे वाटते, त्यामुळे मी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नरेंद्र पाटील यांच्या पक्ष सोडण्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे बोलले जातेय.

‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

कोण आहेत नरेंद्र पाटील ?

नरेंद्र पाटील हे माथाडी कामगार नेते आहेत. सुरुवातीच्या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश करुन सातारा लोकसभा निवडणूक शिवसेनेकडून लढवली. या निवडणुकीत त्यांचा उदयनराजे भोसले यांनी पराभव केला.

Also Read :

‘जिओ कंपनीला संसदेत विशेष सूट, केंद्र सरकार अंबानीवर मेहरबान’ ! ‘या’ नेत्याची केंद्र सरकारवर टीका

खा. नवनीत राणा अॅक्शन मोडमध्ये, अरविंद सावंत यांच्याविरुद्ध FIR दाखल करणार

रोहित पवारांनी भाजपला घेरलं !

‘दर महिन्याला राष्ट्रपती राजवटीची मागणी, त्यात नवीन काय’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा भाजपला टोला

त्या’ 100 कोटींमध्ये प्रत्येकाचा वाटा?, भाजप आमदाराचा गंभीर आरोप

पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटवरुन फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले- ‘मी आजच केंद्रीय गृहसचिवांना भेटतोय’

‘शरद पवारांच्या तोंडून चुकीच्या गोष्टी वदवून घेतल्या’, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

मोठ्या शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ ची शक्यता ?

वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Related Posts