IMPIMP

दिलीप वळसे पाटील होणार नवे गृहमंत्री ?

by pranjalishirish
ncp name confirmed dilip walse patil to be new home minister

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह याच्या आरोपांमुळे अखेर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यामुळे राज्याचा नवा गृहमंत्री कोण होणार अशी चर्चा रंगली आहे. तर मंत्री दिलीप वळसे पाटील Dilip Walse Patil यांच्यावर गृहमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची चर्चा आहे. खुद्द दिलीप वळसे पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

शिवसेनेचे धारदार बाण ! म्हणाले – ‘देशातील निवडणूक आयोग ‘मृत’, EC ची भूमिका संशयास्पद’

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या गृहमंत्री पदावर दिलीप वळसे पाटील Dilip Walse Patil याच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात रंगली होती. अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिलीप वळसे पाटील यांनी यापूर्वी गृहमंत्रीपद सांभाळले आहे. अडचणीच्या काळात अनुभवी नेत्याकडे हे मंत्रीपद द्यावे अशी चर्चा रंगली होती. त्यामुळे अशा अडचणीच्या काळात त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल अशी अपेक्षा पक्षाला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लवकरच त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

‘अनिल देशमुख यांना शरद पवारांचा आशीर्वाद असला तरी…’

दिलीप वळसे पाटीलच का ?

दिलीप वळसे पाटील हे आपल्या शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्तीसाठी ओळखले जातात. त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते चोखपणे बजावतात. याशिवाय आतापर्यंत तरी ते कोणत्याही वादात सापडलेले नाहीत. ते नेहमी वादापासून दूर राहतात. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरुन जोरदार टीका होत असतानाच दिलीप वळसे पाटील Dilip Walse Patil यांच्या खांद्यावर गृहमंत्री पदाची जबाबदारी देण्याचा विचार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे.

PM मोदी, HM शहांना खूश करण्यासाठी मुख्यमंत्र्यावर टीका, टीका करताना फडणवीस-पाटलांनी भान ठेवावे, नाहीतर…

दिलीप वळसे पाटलांचा राजकीय प्रवास

दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग 7 वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. तसेच विधिमंडळाच्या कामकाजाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. 2009 ते 2014 या कालावधीत त्यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून समर्थपणे जबाबदारी सांभाळली आहे. कधीकाळी शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले दिलप वळसे पाटील सध्या राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते आहेत. सध्या उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री आहेत. त्यांनी वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा या खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले आहे.

Also Read :

मोठी बातमी ! अजितदादांना बालेकिल्ल्यातच शह देणार शिवसेना ?

ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला अखेर भाजपचा पाठिंबा पण…

Hasan Mushrif : ‘फडणवीसांना राज्यसभेत पाठवून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार, चंद्रकांत पाटील हे नागपुरातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा’

Param Bir Singh : उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

‘त्या’ आदेशावरुन काँग्रेसकडून आदित्य ठाकरे ‘निशाण्या’वर, राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी (व्हिडीओ)

Devendra Fadnavis : ‘नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार शरद पवारांचा’ (व्हिडीओ)

हफ्ता वसुलीवर चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘इयत्ता 8 वीचा विद्यार्थीही सांगेल सरकार प्रकरण दाबतंय’

राज्यातील गंभीर प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची भूमिका मुख्यमंत्रीपदाला शोभत नाही, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा’

Related Posts