IMPIMP

राष्ट्रवादीचा राम कदमांवर ‘निशाणा’, म्हणाले – ‘मुली उचलून आणण्याची भाषा करणारे, साधूंसाठी आंदोलन करतायेत’

by Team Deccan Express
ncp target ram kadam over sadhu mob lynching case and controversial statement on girls

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मागील वर्षी महाराष्ट्रासह देशाला हादरवून सोडणारी घटना पालघर जिल्ह्यात घडली होती. पालघरमधील गडचिंचोली गावात ग्रामस्थांनी तीन साधूंची हत्या केली होती. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी भाजपचे नेते राम कदम ram kadam यांना नोटीस बजावली आहे. राम कदम साधूंच्या झालेल्या हत्येप्रकरणी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पालघर येथे निघाले होते. दरम्यान पोलिसांनी त्यांना नोटीस देऊन घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे.

या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आमदार राम कदम ram kadam यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन राम कदम यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादीने म्हटले की, भाजप नेते राम कदम पुन्हा एकदा पालघर साधू हत्याकांड प्रकरण चर्चेत आणण्याचा प्रयत्न करत आहे. हे त्यांच्या अपयशाचं प्रतीक आहे. राज्यात फोफावत असलेल्या कोरोना विषाणूच्या बाबतीत ते अजिबात गंभीर नाहीत, असे ट्विट राष्ट्रवादीने केले आहे.

राष्ट्रवादीने दुसरे एक ट्विट केले आहे. यामध्ये राम कदम ram kadam यांच्यावर बोचरी टीका केली असून ट्विटमध्ये म्हटले आहे की, करुन करुन भागले आणि देवधर्माला लागले, ही मराठीतील म्हण महाराष्ट्रातील भाजपच्या ‘चमको’ नेत्यांना तंतोतंत लागू पडते. कालपर्यंत मुली उचलून आणण्याची भाषा वापरणारे आज साधूंसाठी आंदोलन करतायत. जनाची नाही तर मनाची तरी बाळगावी. या ट्विटमध्ये राष्ट्रवादीने एक खास हॅशटॅगही वापरला आहे. त्यांनी #एककदमकोरोनाकिओर असा हॅशटॅग वापरला आहे.

काय आहे प्रकरण ?
16 एप्रिल 2020 रोजी 70 वर्षीय चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी आणि 35 वर्षाय सुशीलगिरी महाराज आपल्या 30 वर्षीय वाहन चालक निलेश तेलगडे हे सुरत या ठिकाणी चालले होते. त्यावेळी देशात कडक लॉकडाऊन असल्याने जागोजागी पोलिस बंदोबस्त आणि कडक निर्बंध होते. अशात गुरु श्री महंत रामगिरी यांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी हे साधु पालघर मार्गे जात होते. त्यावेळी रात्री दहाच्या सुमारास गडचिंचोली गावातून जात असताना स्थानिकांनी त्यांची गाडी आडवली. ग्रामस्थांनी चोर समजून त्यांना बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी होऊन दोन साधू आणि गाडीचा चालक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहेत.

Also Read :

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

 

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’


Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

 

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी

 

चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’

Related Posts