IMPIMP

Nilesh Rane | ‘तुम्ही तरी एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही’

by bali123
nilesh rane tweet gopichand padalkar car attacked

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Nilesh Rane | ओबीसी आरक्षण जनजागृती दौऱ्यावेळी बुधवारी घोंगडी बैठकीसाठी भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) सोलापुरात (Solapur) आले त्यावेळी त्यांच्या गाडीवर दगडफेक (car attacked)  झाली. पडळकर सोलापुरात आले होते. या घटनेनंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. त्यावरून भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, असा इशाराच त्यांनी ट्विटरद्वारे दिला आहे. nilesh rane tweet gopichand padalkar car attacked

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

नितेश राणे (Nilesh Rane) म्हणाले, आमदार पडळकर यांच्या गाडीची काच फोडून जर कोणाला मोठा पराक्रम केला आहे असे वाटत असेल तर एवढं समजून चला की, जेव्हा तुमच्या हातातील सत्ता जाईल
त्यावेळी पुढची पाच वर्षे फुटलेल्या काचा मोजण्यात जातील, असा गर्भित इशारा दिला त्याचवेळी त्यांनी तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही,
अशी धमकीही त्यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्राचा बुलंद आवाज अशी घोषणा देत गाडीवर दगडफेक

सोलापुरात श्रीशैल्य नगर अक्क महादेवी मंदिर येथे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या गाडीवर दगडफेकीची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
ज्याने भला मोठा दगड गाडीवर टाकला त्यावेळी त्याने महाराष्ट्राचा बुलंद आवाज अशी घोषणा देत तिथून पळ काढला. त्याचा पडळकर समर्थकांनी मोटारसायकलवरून पाठलाग केला पण तो मिळून आला नाही.
तत्पूर्वी सकाळी सोलापुरातील पत्रकार परिषदत आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर हॉल चढवला होता.
ते म्हणाले की, साडेतीन जिल्ह्याचे शरद पवार (Sharad Pawar ) स्वामी आहेत.
ते मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे अशी जहरी टीका करत पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी होत असलेल्या बैठकीवरही भाष्य केले.
रात गेली हिशेबात, पोरगं नाही नशिबात, अशा शब्दात पडळकर पवारांवर तुटून पडले होती.

‘आज दगडफेक, उद्या गोळ्या मारतील पण मी मागे हटणार नाही’

गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर एका वृत्त वहिनीला प्रतिक्रिया देताना आमदार पडळकर म्हणाले की, या घटनेमागे कोण आहे हे महाराष्ट्राला माहित आहे.
इथल्या प्रस्थापितांच्या विरोधात मी जी गोरगरीबांची बाजू मांडत आहे ती या लोकांनां आवडली नसावी.
ते जे गप्पा मारत आहेत लोकशाहीच्या, फुले-शाहू-आंबेडकरांच्या, त्यांचं हेच उत्तर आहे का? वैचारिक लढाई तर विचाराने चाला. पण अशाप्रकारे उत्तर देणार असतील तर मी कधी गप्प बसणार नाही.
आज दगड मारले उद्या गोळ्या मारतील पण मी माझी भूमिका मांडणारच असे ते म्हणाले.

Web Title : nilesh rane tweet gopichand padalkar car attacked

Related Posts