IMPIMP

Pankaja Munde | ‘कोणताही शत्रू शुद्र नसतो, भाजप कार्यकर्त्यांच्या धमन्यांत संस्कार’ – पंकजा मुंडे

by nagesh
Maharashtra MLC Elections 2022 | bjp pankaja munde supporters tried to attack party office in aurangabad

नाशिक : वृत्तसंस्थाPankaja Munde | भाजपच्या (BJP) राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी अनेक पैलुंवर भाष्य केलं आहे. आज (मंगळवारी) पंकजा मुंडे या नाशिक (Nashik) दौ-यावर आले आहेत. कोणताही शत्रू शुद्र नसतो. असा एकही व्यक्ती नाही, ज्याच्या मनात सल नाही. भाजप कार्यकर्त्यांच्या धमण्यांमधून संस्कार वाहतो. असं विधान पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

 

त्यावेळी बोलताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या की, आमचा उमेदवार आघाडीवर असल्याचं जयकुमार भाऊंनी मला आता सांगितलं. मी मध्यप्रदेशची आहे ना, आता मी बाहेरची आहे. खरं सांगू, पण मला वाटलंच नाही मी बाहेर आहे. अस वाटलं मी माहेरीच आहे. कोणताही शत्रू शुद्र नसतो. असा एकही व्यक्ती सापडणार नाही, की ज्याच्या मनात सल नाही. मात्र, हे सगळं बाजूला ठेवून काम करा, असं आवाहन पकंजा मुंडे यांनी केलं.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

दरम्यान, पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, राम मंदिराचे स्वप्न पूर्ण होईल असं कोणाला वाटलं नव्हतं, पण ते आता होतंय, असे त्या म्हणाल्या. तर, पुढे म्हणाल्या, राजकारणात उदाहरण सेट करण्यासाठी चांगले लोक यावेत. अनिल देशमुख यांची अटक हा प्रक्रियेचा भाग आहे. ती सुरू आहे. मी जज नाही. त्याच्यावर जे बोलत आहेत, ते इतके बोलत आहेत की, मला बोलण्याची आवश्यकता नाही. मी पेन घेऊन बसलेले नाही, असा चिमटा देखील त्यांनी काढला. मंत्री झाल्यावर मी अनेक योजना नाशिकमध्ये राबवल्या. आज मी राष्ट्रीय सचिव म्हणून इथे आले आहे. येणाऱ्या काळात सार्वजनिक वाहतूक वाढवली पाहिजे. अशा बस उपलब्ध झाल्या, तर वाहतूक कोडींचा प्रश्न कमी होईल, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी शहर बसचे कौतुक केले आहे.

 

Web Title : Pankaja Munde | BJP Leader pankaja munde political statement in nashik

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | भाजपाचे लोक काय जंगलात राहतात का? त्यांच्या सर्व मालमत्ता काय वैध आहेत का? – संजय राऊत

Nagpur Crime | धक्कादायक ! आजी आणि मामीला घाबरवण्यासाठी खेचला गॅसचा पाइप; 12 वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू

Sameer Wankhede | महागडे कपडे आणि घड्याळांच्या आरोपावरुन समीर वानखेडेंनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…

 

Related Posts