IMPIMP

Sameer Wankhede | महागडे कपडे आणि घड्याळांच्या आरोपावरुन समीर वानखेडेंनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…

by nagesh
Mumbai Cruise Drug Case | ncb officer sameer wankhede removed from investigation of aryan khan drug case and sameer khan son in law of nawab malik case

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Sameer Wankhede | मुंबईच्या समुद्रात क्रूझ ड्रग्ज पार्टीवर (Mumbai Cruise Drug Party) एनसीबीने कारवाई केली. त्यानंतर या प्रकरणावरुन अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे मुंबई एनसीबीचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर वारंवार गंभीर आरोप करताना दिसत आहेत. आजही मलिकांनी मोठा खळबळजनक आरोप केला आहे. वानखेडे परिधान करत असलेले कपडे आणि घड्याळांची किंमत 5 ते 10 कोटींच्या घरात आहे, असा आरोप त्यांनी केला. या आरोपानंतर समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

 

समीर वानखेडे (Sameer Wankhede) म्हणाले, माझ्या महागड्या कपड्यांची केवळ अफवा आहे. मलिक यांनी लोखंडवाला मार्केटमध्ये जावं आणि तिथं कपड्यांचे दर माहिती करुन घ्यावेत. त्यांनी खरी माहिती शोधून काढावी, असा टोला समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांना लगावला आहे. यासोबतच एका ड्रग पेडलकरनं आपल्या कुटुंबाला फसवण्याचा प्रयत्न केला होता असा गौप्यस्फोटही समीर वानखेडे यांनी केला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पुढे बोलताना समीर वानखेडे म्हणाले की, सलमान नावाच्या एका ड्रग पेडलरनं माझ्या बहिणीशी संपर्क साधला होता. पण माझ्या बहिणीनं वेळीच त्याची केस घेण्यास नकार दिला होता. एनडीपीएस प्रकरणं मी हाताळत नाही असं तिनं त्यावेळी सांगितलं होतं आणि त्याला पळवून लावलं होतं. याच व्यक्तीच्या माध्यमातून माझ्यासह माझ्या कुटुंबाला ट्रॅपमध्ये अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानं एका खोट्या तक्रारीसह मुंबई पोलिसात धाव घेतली होती. पण त्यातून पुढे काहीच झालं नाही, असं समीर वानखेडे (Sameer Wankhede) म्हणाले.

 

काय म्हणाले मलिक?

समीर वानखेडेंनी गेल्या महिन्याभरात 5 ते 10 कोटींचे कपडे वापरले आहेत, असा दावा मलिक यांनी केला.
वानखेडे 2 लाखांचे बूट, 70 हजारांचे शर्ट, 30 हजारांचे टी-शर्ट, 1 लाखाची पँट वापरतात.
ते वापरत असलेल्या घड्याळ्यांची किंमत 20 लाखांपासून 1 कोटीपर्यंत आहे, असा खळबळजनक दावा मलिक (Nawab Malik) यांनी केला होता.

 

Web Title :- Sameer Wankhede | ncb officer sameer wankhede replay ncp leader nawab malik allegations of cloths and watch

 

हे देखील वाचा :

Pune Crime | दुचाकीस्वाराला अडवून तलवारीने मारहाण करुन लुटले; पुण्याच्या कोंढव्यातील खडी मशीन चौकात घडला प्रकार

Sanjay Raut | ‘बॉम्ब फोडले तर भाजपाचे लोक बाथरुममध्ये तोंड लपवतील असे गौप्यस्फोट करु’ – संजय राऊत

Organ Donation | 14 वर्षाच्या ब्रेन डेड मुलानं पुण्यातील व्यक्तीसह 6 गरजूंना दिलं ‘जीवदान’ ! हृदय, फुफ्फुस, डोळे, लीव्हर आणि दोन्ही हात आई-वडिलांनी केले ‘दान’

 

Related Posts