IMPIMP

PM Modi | ‘आपण भाग्यवान म्हणून ड्रायव्हिंग लायसन्सवर तरी आपला फोटो आहे’; पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

by nagesh
PM Modi | diksha raut criticised pm modi over image corona vaccine certificate

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन PM Modi | कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) फोटोवरून अनेक चर्चा होताना दिसत आहेत. या विषयावरून विरोधक आक्रमक होत आहेत. कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवर (Certificate of Corona Vaccine) पंतप्रधान मोदींचा फोटो असण्यावरून राज्यसभेत सवाल उपस्थित करण्यात आला होता. या सवालावर केंद्र सरकारने दिलेल्या उत्तरावरुन आणखी एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. यावरून ऊर्जामंत्री नितीन राऊत (Minister Nitin Raut) यांच्या कन्या दीक्षा राऊत (Diksha Raut) यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. आपण स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे की गाडी चालवण्याच्या परवान्यावर तरी आपला फोटो आहे, असा टोला दीक्षा राऊत यांनी लगावला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) फोटो असल्याने राजकीय वाद निर्माण होताना दिसत आहेत. दरम्यान, राज्य सरकार कंपन्यांकडून लस खरेदी करत होते, तेव्हा अनेक राज्यांनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह लसीकरण प्रमाणपत्र जारी केले होते. दरम्यान, या विषयावरून दीक्षा राऊत (Diksha Raut) यांनी ट्विटच्या माध्यमातून असं म्हटलं आहे की, ‘आपण स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे की, आपल्या ड्रायव्हिंग लायसन्सवर स्वतःचाच फोटो आहे. मास्क नसलेल्या माणसाचा फोटो शक्यतो कोरोनावर जागरूकता करू शकत नाही, अशा शब्दात ट्विट दीक्षा राऊत (Diksha Raut) यांनी केलं आहे.

 

 

कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा फोटो छापण्याची गरज काय, असा सवाल अनेकांकडून केला जात आहे. अनेक राज्यांनी तर त्या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो हा त्या प्रमाणपत्रावर असावा, अशी मागणी केलीय. पंतप्रधान मोदींचा फोटो आणि त्या सोबतचा संदेश हा या प्रमामाणपत्रावर छापण्यामागे जनजागृती करण्याचा हेतू आहे. असं म्हटलं आहे. यावरूनच दीक्षा राऊत (Diksha Raut) यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे.

 

 

Web Title :- PM Modi | diksha raut criticised pm modi over image corona vaccine certificate

 

हे देखील वाचा :

Maharashtra Unlock | व्यावसायिकांना मोठा दिलासा ! राज्यात 15 ऑगस्टपासून मॉल्स, दुकाने, हॉटेल्स, बार सुरु; पण मल्टिप्लेक्स, मंदिरे अन् प्रार्थनास्थळे बंदच

Toll GPS System | टोल प्लाझावरून जाणार्‍यांसाठी महत्वाची बातमी, 3 महिन्यात सुरू होणार तुमच्यासाठी नवीन सुविधा; जाणून घ्या

Twitter ची Congress च्या अनेक नेत्यांवर कारवाई, लॉक केले ऑफिशियल अकाऊंट; जाणून घ्या कारण

 

 

Related Posts