IMPIMP

Pooja Chavan Suicide Case : चित्रा वाघ यांची वानवडी पोलिस ठाण्यात एन्ट्री, पोलिस निरीक्षक दीपक लगड यांच्याशी ‘बाचाबाची’

by sikandershaikh
chitra-wagh-allegedly-says-pune-police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (pooja chavan case) वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर याला राजकीय वळण मिळत आहे. त्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू झालेल्या वानवडी परिसरातील इमारतीला भेट देऊन पाहणी केली. मात्र, चित्रा वाघ आणि वानवडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक लगड यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली.

 

चित्रा वाघ म्हणाल्या, की पूजा चव्हाण ज्या फ्लॅटमध्ये राहत होती तो फ्लॅट सील आहे आणि वरचे चार फ्लॅटही रिकामे आहेत. आम्ही त्या फ्लॅटच्या वरच्या फ्लॅटची पाहणी केली. गॅलरीतील ग्रीलची पाहणी केली आहे. ग्रीलची उंची पाहता पूजा चव्हाण स्वत: खाली पडली ? का तिला खाली ढकलले गेले ? हे प्रश्न कायम आहेत. त्यानंतर चित्रा वाघ यांची पोलिस निरीक्षक लगड यांच्याशी बाचाबाची झाली. दीपक लगड यांच्याकडून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा (pooja chavan case) तपास काढून घेण्याची मागणी केली आहे. याशिवाय या प्रकरणाचा तपास एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याकडे द्यावा, अशी मागणीही वाघ यांनी केली आहे.

दरम्यान, मला आता विश्वास आहे, की मुख्यमंत्री पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात लक्ष घालतील. त्यांना ही संपूर्ण घटना माहीत आहे. ते संजय राठोड यांचा राजीनामा घेतील. राठोड यांच्यासारख्या घाणेरड्या माणसाला मंत्रिमंडळातून हाकलून देतील, असेही त्या म्हणाल्या.

Related Posts