IMPIMP

बिजनौर शेतकरी महापंचायत : PM नरेंद्र मोदींना ‘देशभक्त’ आणि ‘देशद्रोही’ मधील फरक ओळखता येईना – प्रियंका गांधी

by sikandershaikh
priyanka gandhi

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे सोमवारी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा (priyanka gandhi) यांनी किसान महापंचायतीला संबोधित केले. जनतेनं दोनदा पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडून दिलं आहे. कारण लोकांनी त्यांच्याकडून काही तरी आशा बाळगली असेल. या निवडीसाठी मोदी यांनी वारंवार रोजगार, शेतकरी यांचे मुद्दे घेतले होते. मात्र, आता नरेंद्र मोदी यांच्या राज्यात त्यांच्यासाठी काहीच घडत नाही, असे प्रियांका गांधी वाड्रा म्हणाल्या.
दरम्यान, शेतकरी आंदोलनात प्राणाची आहुती देणार्‍या शेतकर्‍यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

प्रियंका गांधी (priyanka gandhi) म्हणाल्या, मोदी सरकारने 2017 पासून उसाचे दर वाढलेले नाहीत. पीएम मोदी यांनी शेतकर्‍यांची थकबाकी पूर्ण दिलेली नाही. अन् स्वत: साठी 16 हजार कोटी विमानांची खरेदी केली आहे. मोदी सरकारने आणलेल्या नवीन कायद्यामुळे उद्योगपतीचं फावत आहे.

आता खासगी मंडई उघडल्या जातील. तसेच सरकारी मंडई बंद पडतील. खासगी मंडईत टॅक्स घेतला जाईल. यामुळे एमएसपीचे अस्तित्त्व संपुष्टात येईल. मोदी सरकारने आणालेले कायदे हे केवळ उद्योगपतींचे भलं करत आहेत, शेतकर्‍यांचं नाही, असेही त्या म्हणाल्या.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

हे मोदी सरकार देशातील दोन तीन लोकांना विकत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका, चीन आणि पाकिस्तानला जातात. परंतु आपल्या देशातील दिल्लीत बसलेल्या शेतकर्‍यांची ते भेट घेऊ शकत नाहीत.
त्यांची ते चेष्टा करत आहेत. तसेच त्यांना आंदोलक-परजीवी म्हणत आहेत.
म्हणूनच नरेंद्र मोदी यांना देशभक्त आणि देशद्रोहामधील फरक ओळखता येईना, अशा शब्दांत प्रियंका यांनी टीका केलीय.

ज्यांनी तुम्हाला सत्तेवर बसवले आहे, त्यांचा आदर करा आणि हे कायदे मागे घ्या.
या सरकारच्या कार्यकाळात शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे.
हे सरकार श्रीमंतांना मदत करत आहे.

प्रियांका गांधी यांनीही दिली सहारनपूरला भेट

पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
अशा परिस्थितीत काँग्रेस शेतकरी चळवळीच्या मदतीने स्वत: ला उभे करण्याचा प्रयत्न करीत आहे.
सहारनपुरातील पहिले किसान महापंचायत, त्यानंतर मौनी अमावस्यानिमित्त प्रयागराजला भेट देऊन प्रियंका गांधी (priyanka gandhi) आता यूपीमध्ये खूप सक्रिय झाल्या आहेत.

Kidney Stones : ‘इम्यूनिटी’ वाढविणार्‍या आंबट फळांपासून ‘किडनी स्टोन’चा धोका ! ‘या’ 6 गोष्टींपासून देखील राहा दूर, जाणून घ्या

Related Posts