IMPIMP

Puducherry Floor Test : काँग्रेसला मोठा झटका ! बहुमत सिद्ध करता न आल्यानं पुदुचेरीत सरकार कोसळलं

by sikandershaikh
puducherry-floor-test-live

पुदुचेरी : वृत्तसंस्थाPuducherry Floor Test |काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे, पुदुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी हे विधानसभेत बहुमत सिद्ध करू न शकल्याने येथील काँग्रेसचे सरकार कोसळले आहे. मुख्यमंत्री नारायणसामी बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष तमिलिसाई सौदरराजन यांनी केली. मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी आज सकाळी बहुमत असल्याचा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्ष सभागृहात त्यांना बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्याने सरकार कोसळल्याचे स्पष्ट झाले.

 

पुदुचेरीच्या नवनियुक्त उपराज्यपालांनी सोमवारी संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. काँग्रेसचे आमदार के. लक्ष्मीनारायण आणि द्रमुखचे आमदार व्यंकटेशन यांनी रविवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर 33 सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत काँग्रेस-द्रमुक आघाडीच्या आमदारांची संख्या 11 झाली. तर विरोधीपक्षांचे 14 आमदार आहेत.

पुदुचेरी विधानसभेतील एकुण 33 जागांपैकी 30 सदस्यांची निवड ही निवडणूक प्रक्रियेतून होते, तर उर्वरित 3 सदस्यांची निवड केंद्र सरकार करते. 2016 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने 15 जागांवर विजय मिळवला होता. तर द्रमुकच्या 3 आमदारांनी काँग्रेसला समर्थन दिले होते. यापैकी एका आमदाराने रविवारी राजीनामा दिला होता. आतापर्यंत एकूण 5 आमदारांनी राजीनामा दिलेला असल्याने नारायणसामी सरकार डळमळीत झाले होते, ते आज अखेर कोसळले.

Related Posts