IMPIMP

Pune BJP | घरकोंबड्या सरकारमुळेच अत्याचार वाढले; महिलांच्या सुरक्षेसाठी भाजपचे गणरायासमोर ‘साकडे आंदोलन’ !

by nagesh
Pune BJP | Atrocities increased because of the homeless government; BJP's 'Sakade Andolan' in front of Ganaray for women's safety!

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune BJP | घरकोंबड्या ठाकरे सरकारच्या निषेधार्त आज पुणे शहर भाजपा महिला आघाडीच्या (Pune City BJP Women’s Front) वतीने भवानी पेठेमध्ये (Bhavani Peth) गणरायाच्या चरणी साकडे आंदोलन करण्यात आले. या सरकारला सद्बुद्दी मिळो व महिलांवर होणाऱ्या अत्याचार विरोधात संघर्ष करण्याची व लढा देण्याची ताकत मिळो हि प्रार्थना गणरायाच्या चरणी पुणे शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले.

भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे (BJP women state president Uma Khapre) यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपा महिला आघाडी पुणे शहर अध्यक्षा आणि नगरसेविका अर्चना तुषार पाटील (PMC corporator archana tushar patil) यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

 

उमा खापरे म्हणाल्या गेले काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणारे अत्याचार, विनयभंग, छेडछाड, बलात्कार चे प्रमाण वाढत असल्याचे चित्र स्पष्ट असून देखील त्यावर ठाकरे सरकार तसेच प्रशासनाकडून कोणतेही ठोस निर्णय घेताना दिसत नाही कारण सध्या असलेले महाराष्ट्रतील ठाकरे सरकार हे अत्यंत निष्क्रिय असून महिलांच्या बाबतीत बेजबाबदार आहे.
महाराष्ट्रात महिलांवर होत असलेले अत्याचार थांबले पाहिजेत,

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी घरा बाहेर पडून महाराष्ट्रातील महिलांच्या व्यथा समजून घ्याव्यात व कायद्यांची अंमलबजावणी प्रभावी करावी अर्चना तुषार पाटील (BJP Women’s Front Pune City President archana tushar patil) यांनी महिलांच्या सुरेक्षेच्या व सवंक्षणाकरिता असलेल्या शक्ती कायद्याची अंमलबजावणी का होत नाही ? त्याचप्रमाणे महिला आयोगाला अध्यक्ष का मिळत नाही याबाबत या माध्यामतून सरकारला विचारणा केली. महिलांवर होणारे अत्याचार हे तिघडी सरकार नुसते बघत आहे.
पोलिस प्रशासन ही राजकीय दबावाला बळी पडत आहे. यामुळे महिलांना न्याय मिळत नाही.
आता तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जागे व्हा आणि महाराष्ट्रातील महिलांच्या व्यथा जाणून घ्या.

 

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, पुणे शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चना पाटील, अश्विनी पवार,
रेश्मा सय्यद, गायत्री भागवत, रेखा चोंदे, कांचन कुंबरे, विजया भोसले, माधुरी गिरमकर, परवीन तांबोळी
तसेच महिला आघाडीच्या सदस्या आणि पदाधिकारी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका अर्चना पाटील यांनी केले होते.

 

 

Web Titel :-  Pune BJP | Atrocities increased because of the homeless government; BJP’s ‘Sakade Andolan’ in front of Ganaray for women’s safety!

 

हे देखील वाचा :

Modi Government | नोकरीचे टेन्शन संपले ! मोदी सरकारच्या योजनेत अर्ज करून लवकर कमवा जास्त पैसे, जाणून घ्या

Earn Money | नशीब उजळू शकते, घरबसल्या कमावा ‘इतके’ लाख रुपये महीना; लवकर उचला ‘हे’ पाऊल, जाणून घ्या

Earn Money | फायद्याची गोष्ट ! 110 रुपये खर्च करुन दरमहिना Bank Account मध्ये येतील ‘इतके’ हजार रुपये, जाणून घ्या

 

Related Posts