IMPIMP

Pune Corporation | समाविष्ठ गावातील कामाच्या श्रेयासाठी भाजप – राष्ट्रवादीचे नगरसेवक सरसावले

Pune PMC News | corona testing scam worth lakhs in pune pmc pune municipal corporation attempts by senior officials to suppress the scam
January 25, 2022

पुणे – सरकारसत्ता ऑनलाइन Pune Corporation | निवडणूक जशी जवळ येत आहे तसे नगरसेवक झपाटून कामाला लागले आहेत. त्यातही आयुक्तांनी ‘ वित्तीय समितीच्या ‘ माध्यमातून खर्चावर मर्यादा आणल्या आहेत त्यातून कामांच्या श्रेय वादावरून नगरसेवक हमरीतुमरीवर उतरल्याचे
पाहायला मिळत आहे. कात्रज (Katraj) येथे दोन माननीयांमध्ये वादाचा प्रसंग घडला असताना आज म्हाळुंगे (Mahalunge) या नव्याने समाविष्ट
झालेल्या गावातील रस्त्याच्या कामाचे ‘ श्रेय ‘ मिळवण्यासाठी बाणेर – बालेवाडी प्रभागातील (Baner-Balewadi Prabhag) नगरसेवकांनी रस्त्याच्या
‘दोन्ही ‘ टोकांना स्वतंत्र भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला. एवढेच न्हवे तर एका ज्येष्ठ नगरसेवकाने (Corporators in PMC) तर ठेकेदाराकडील ‘
वर्क ऑर्डर’च (PMC Work Order) काढून घेतल्याने अधिकारी आणि ठेकेदाराची भलतीच अडचण झाली. (Pune Corporation)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महापालिकेच्या पथ विभागाच्या वतीने नव्याने समाविष्ट झालेल्या म्हाळुंगे ते बालेवाडी (Baner-Balewadi) स्टेडियम दरम्यानच्या रस्त्याच्या (Balewadi Stadium Road) कामाची निविदा मंजूर करण्यात आली आहे. आज त्या कामाचे भूमिपूजन करून प्रत्यक्षात कामास सुरुवात करण्यासाठी अधिकारी व ठेकेदार त्याठिकाणी पोहोचले. परंतु रस्त्याच्या एका एंडला भाजपच्या नगरसेवकांनी (BJP Corporators in PMC) भूमीपूजनाची तयारी केली. तर दुसऱ्या एंडला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाने (NCP Corporators in PMC) तयारी केली. आता दोन्ही बाजूला माननीय सामोरा समोर ठाकल्याने अधिकारी व ठेकेदाराची चांगलीच गोची झाली. अशातच एका माननीयांनी थेट ठेकेदाराकडील वर्क ऑर्डरची ओरिजिनल कॉपीच घेऊन गेला यामुळे गोंधळ उडाला. या घटनेमुळे उपस्थितांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. अखेर अधिकारी आणि ठेकेदाराने दोन दिवसांनी यातून मार्ग काढून काम सुरू करण्याचे ठरवत तेथून काढता पाय घेतला. (Pune Corporation)

मुळातच हा भाग नव्याने समाविष्ट झाल्याने मुख्य खात्याच्या वतीनेच हे काम होणार आहे. मात्र आगामी निवडणुकी मध्ये हा भाग आपल्या प्रभागाला जोडला जाणार असल्याने बाणेर – बालेवाडी प्रभागातील भाजप चे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाने मागील काही महिन्यांपासून म्हाळुंगे व सुस या नवीन गावांत संपर्क वाढविण्यासोबतच पाणी, रस्ते, ड्रेनेजच्या कामांसाठी पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या एका माननियांनी तर स्वखर्चाने टँकरने पाणी पुरवठा केला. निवडणुकांचा बिगुल केंव्हाही वाजू शकतो. त्यामुळे ‘ विकास पुरुष ‘ हे बिरुद मिरवण्यासाठी प्रत्येकच सभासद येनकेन प्रकारे श्रेयवादासाठी झगडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title : Pune Corporation | BJP-NCP corporators rushed for the credit of the work in the included village in PMC

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे नवीन दर

LIC Saral Pension Plan | एलआयसीच्या ‘या’ योजनेत एकदा प्रीमियम देऊन दरमहिना मिळवू शकता 12,000 रुपयांची पेन्शन, जाणून घ्या सविस्तर माहिती

Parbhani Crime | दुर्देवी ! शाळेत जाताना काळाने केला मोठा घात; ट्रकच्या धडकेत 3 भावडांचा मृत्यु