IMPIMP

Raj Thackeray | नारायण राणे-शिवसेना संघर्षावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

by nagesh
MNS Chief Raj Thackeray | police take objection to some provocative statements of raj thackeray aurangabad sabha

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Raj Thackeray । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात दहीहंडी उत्सव (Dahihandi festival) साजरा करू नये, याबाबत राज्य सरकारने (Maharashtra Government) निर्बंध आणले आहेत. मात्र राज्य शासनाचे नियम धुडकावून काही ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. भाजप आणि मनसे (BJP and MNS) यांनी दहीहंडी उत्सव व्हावा यासाठी जोर धरला होता. दरम्यान, मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही दहीहंडी उत्सव साजरा केला. याबाबत मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी समर्थनार्थ भूमिका घेत तसेच, राज्यातल्या नारायण राणे-शिवसेना संघर्षावरही आपली भूमिका मांडली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

राज ठाकरे (Raj Thackeray) हे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, ‘सर्व गोष्टी चालूच आहेत की. नारायण राणेंच्या विरोधात जे झालं, यांच्या हाणामाऱ्या सुरु आहेत.
बाकीच्या सगळ्यांचे मेळावे सुरु आहेत. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या मुलाने मंदिरात जाऊन अभिषेक केला.
म्हणजे यांच्यासाठी मंदिरं सुरु, बाकीच्यांनी मंदिरात जायचं नाही.
यांनी मेळावे, सभा घ्यायच्या पण आम्ही दहीडंही साजरी करायची नाही.
कुठूनही गर्दी कमी झालेली दिसत आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले मैदानांमध्ये क्रिकेट, फुटबॉल खेळत आहेत.
महापौर बंगल्याजवळ सरकारकडून कामं करुन घेण्यासाठी येणाऱ्या बिल्डरांच्या गाड्या काही कमी झालेल्या नाहीत.
मग सणांवरच का निर्बंध येतात? अशी देखील त्यांनी विचारणा केलीय.
पुढं त्यांनी भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर (Jan Ashirwad Yatra) देखील टीका केलीय.
‘जन आशीर्वाद यात्रा झाली ती चालली. तेव्हा तुमचा लॉकडाउन नाही.
सण आला की लॉकडाउन, म्हणजे सणांमधून रोगराई पसरते.
यांच्या जन आशीर्वाद यात्रेतून, मेळाव्यांमधून, हाणामाऱ्यांमधून नाही.
हवंय तेवढं वापरायचं आणि जनतेला घाबरवायचं असं सुरुय, असं राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले आहेत.

 

Web Title : raj thackeray on dahihandi corona restrictions in maharashtra lockdown in maharashtra

 

हे देखील वाचा :

Pune Crime Branch Police | पुण्याच्या विमाननगरमधील हुक्का बारवर गुन्हे शाखेचा छापा; 2 लाखाचा मुद्देमाल जप्त

MSRTC Electric Buses | आता लवकरच धावणार इलेक्ट्रिक एसटी ! पुण्यातून औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर आणि महाबळेश्वरचा प्रवास होणार ‘सुखद’

 

Related Posts