IMPIMP

महाराष्ट्रापेक्षा गुजरातला लसीचा पुरवठा अधिक, राजेश टोपेंचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

by pranjalishirish
rajesh tope vaccination maharashtra less supply center demand give 40 lakhs doses week

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून राज्य सरकारकडून लसीकरण मोठ्या प्रमाणत करण्यात येत आहे. मात्र राज्यात लसीचे डोस उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद करावी लागत आहेत. या मुद्यावरुन आरोग्यमंत्री राजेश टोपे  Rajesh Tope यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषद घेऊन केंद्राकडून पुरवठा होत असलेल्या लसीकरणाची वस्तुस्थिती प्रसार माध्यमांसमोर मांडली. यावेळी त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यासंदर्भात तक्रार केली आहे. त्यांनी तातडीने योग्य ते निर्देश देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती दिली. तसेच इतर काही मुद्यांवरुन प्रश्न उपस्थित केले आहेत.

माझे मौन हे कुणी कमजोरी समजू नये’, दवेंद्र फडणवीस सरकारवर कडाडले

दुजाभाव का कशासाठी ?

राजेश टोपे Rajesh Tope   म्हणाले, देशात महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक असताना लसीच्या पुरवठ्याबाबत दुजाभाव का कशासाठी ? राज्यात आज केवळ साडेसात लाख लसीचे डोस पुरवण्यात आले. मात्र इतर राज्यांना 40 लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. या संदर्भात माझे केंद्रीय मंत्र्यांसोबत बोलणे झाले असून त्यांनी तुमचा फोन ठेवताच संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून योग्य निर्णय घेण्याचे निर्देश देतो असे सांगितल्याचे टोपे यांनी सांगितल आहे.

आठवड्याला 40 लाख डोस द्या

दर आठवड्याला 40 लाख लसींचा पुरवठा करण्याची केंद्राकडे मागणी केली आहे. केंद्र सरकार लस पाठवत नाही असे नाही पण लस पाठवण्याचा वेग कमी आहे. यामध्ये राजकारणाचा मुद्दा नाही. मात्र ज्यापद्धीतने पुरवठा होत आहे तो योग्य नसल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

‘खंडणीचे आरोप निराधार, माझी नार्को टेस्ट करा’ ! परब यांचे आव्हान

गुजरातला लसीचा पुरवठा जास्त

राजेश टोपे Rajesh Tope यांनी गुजरात आणि महाराष्ट्राला पुरवण्यात येणाऱ्या लसीच्या पुरवठ्याची तुलना करुन महाराष्ट्रावर अन्याय का ? असा सवाल उपस्थित केला आहे. गुजरातपेक्षा महाराष्ट्राची लोकसंख्या अधिक आहे. राज्यात सध्या साडेचार लाखांपेक्षा अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर गुजरातमध्ये सध्या 17 हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहे. असे असताना महाराष्ट्रापेक्षा गुजरातला लसीचा पुरवठा अधिक केला जात आहे. केंद्र आणि राज्यात समन्वय असणे आवश्यक आहे. हा वादाचा मुद्दा नाही मात्र गरजेनुसार पुरवठा होणे गरजेचे असून आमची मागणी योग्य असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

‘राज्यात कठोर निर्बंध आवश्यक’, शरद पवारांनी जनतेला केले ‘हे’ आवाहन (व्हिडीओ)

18 वर्षावरील सर्वांना लस द्या

अमेरिकेसारख्या विकसित देशाने आपल्या देशात 18 वर्षावरील सर्वांना लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या देशात देखील याची सुरुवात करायला पाहिजे. कारण याच वयोगटातील लोक जास्त बाहेर फिरत आहेत. इतर देशांना लस पुरवली पाहिजे पण सध्या आपल्या देशाला लसीची गरज आहे. याची काळजी घेऊन 18 वर्षावरील वयोगटाला लस देण्याची घोषणा केंद्राने करावी, अशी मागणी टोपे यांनी यावेळी केली.

Read More : 

चित्रा वाघ-रुपाली चाकणकर यांच्यात रंगला ‘कलगीतुरा’ !

परमबीर सिंग NIA च्या कार्यालयात ! सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार

‘मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांवर नियंत्रण नाही, आता राजीनाम्यासाठी रांग लागेल’, केंद्रीय मंत्र्याचा दावा

‘त्या’ वक्तव्यावरुन संजय निरुपम यांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले -‘बहिरा नाचे आपन ताल…’

‘खा. प्रताप पाटील-चिखलीकरांची माणसे निवडून देऊ नका, भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल’; भाजपमधील गटबाजी उघड

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज शरद पवारांची भेट घेणार

पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचे ‘स्टार’ प्रचारक कोरोनाबाधित

आ. शिवेंद्रराजे यांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘Lockdown लावून प्रशासनाकडून मोगलाई’

Coronavirus : न्यूझीलंडने भारताबाबत घेतला मोठा निर्णय, 28 एप्रिलपर्यंत ‘नो एंट्री’

Chitra Wagh : ‘ही मंडळी भ्याडच म्हणावी लागतील’

सचिन वाझेंच्या पत्रावरून फडणवीस म्हणाले; ‘पत्र गंभीर…

Related Posts