IMPIMP

Ramdas Athawale | ‘उद्धव ठाकरेंना बरं होण्यास 2-3 महिने लागतील, मुख्यमंत्र्याचा पदभार देवेंद्र फडणवीसांना द्यावा’ – रामदास आठवले

by nagesh
Ramdas Athawale | Praise of Ramdas Athawale from Nagpur for giving employment to PM Modi through poetry

मुंबई :सरकारसत्ता ऑनलाइन – Ramdas Athawale | राज्याचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session) सध्या सुरु आहे. यात सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची तब्येतीच्या कारणास्तव अनुपस्थिती आहे. यावरुनही विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. अशातच आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले की, ‘राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृती अस्वस्थेमुळे घरीच आराम करत आहेत. त्यामुळे,
मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे देण्याची मागणी आठवले यांनी केली. मुख्यमंत्री आजारी असल्याने मुख्यमंत्रिपद इतर कोणाकडे सोपवावं? याबाबत आठवलेंना सवाल केला होता. या सवालावर आठवले यांनी हास्यास्पद विधान केलं आहे.

 

‘मला वाटतं की मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीसांकडे द्यावे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत ही गोष्ट खरी आहे. अजून त्यांना ठीकठाक होण्यासाठी दोन-तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे,’ असं देखील रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) शिवसेना बाहेर पडेल आणि राज्यात लवकरच भाजप-सेना (BJP-Shiv Sena) युतीचे सरकार येईल असे भाकीत देखील त्यांनी केलं होतं. महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही, लवकरच जाईल असंही आठवले यांनी काही दिवसांपुर्वी म्हटलं होतं.

 

 

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 80 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पुण्यात बॉलपेनवरुन घरफोडीचा गुन्हा उघड, विमानतळ पोलिसांकडून 29 लाखांचा मुद्देमाल जप्त; जाणून घ्या प्रकरण

Risk Free Money | जर तुम्ही तुमचे बचतीचे पैसे ‘या’ ठिकाणी गुंतवले तर तुम्हाला होईल फायदा ! जाणून घ्या कसा बनवला जातो ‘रिस्क फ्री मनी’

 

Related Posts