IMPIMP

Rupali Chakankar | BJP खासदाराच्या सुनेला मारहाण; सुनेच्या मदतीसाठी धावल्या राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर

by nagesh
Rupali Chakankar Threat Case | Bhausaheb Shinde Arrested In Maharashtra State Womens Commission Chairperson Rupali Chakankar Threat Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन वर्ध्यातील (Vardha) भाजपा खासदार रामदास तडस (BJP MP Ramdas Tadas) यांच्या सुनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. त्या व्हिडीओ मध्ये त्यांनी सासरकडचे लोक मारहान करत असल्याचे म्हटले आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी रामदास तडस यांच्या सुनेचा व्हिडीओ (Video) ट्वीट केला आहे. रामदास तडस यांच्या सुनेच्या मदतीला चाकणकर (Rupali Chakankar) धावून गेल्या आहेत .

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

रामदास तडस (BJP MP Ramdas Tadas) यांच्या सुन पुजा यांनी सासरकडचे लोक अत्याचार करत असल्याचा आरोप केला आहे. तेथील लोक
मारहाण करत असल्याचा आरोप केला आहे. यावरुन त्यांचा व्हिडीओ रुपाली चाकणकर यांनी टि्वटरवर पोस्ट केला आहे. रुपाली चाकणकर (Rupali
Chakankar) म्हणाल्या की, ‘आज मला माझ्या मोबाइलवर एक व्हिडीओ आला. रडण्याचा आवाज येत होता. मी पूजा बोलतेय. मला मदतीची गरज
आहे. मला इथून बाहेर काढा. अन्यथा माझ्या जीवाला धोका आहे. अशा स्वरुपाचा तो व्हिडीओ होता” अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.

 

 

‘पूजा माझ्याशी बोलत होती. माझ्या जीवाला धोका आहे. मला त्रास होतोय. मी आज पोलीस स्टेशनला जाणार होते. पण मी तिथपर्यंत पोहोचू नये, यासाठी तडस कुटुंबीय माझ्यावर जीवघेणा हल्ला करु शकतात” असं तिने सांगितल्याचं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत. पुढं त्या म्हणाल्या की, “पूजाचा व्हिडीओ मिळाल्यानंतर मी लगेच पोलिसांशी संपर्क साधला. माझ्या महिला पदाधिकाऱ्यांशी बोलले. पूजा जिथे आहे, तिथे पोलीस आणि महिला पदाधिकारी पोहोचल्या आहेत. पोलिसांची तिला संरक्षण देण्याची जबाबदारी आहे” असे रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) म्हणाल्या, “रामदास तडस यांचे कुटुंबीय घरच्या सुनेला प्रचंड त्रास देत होते. ती तणावाखाली आहे. पोलीस प्रशासनाने आरोपींविरोधात कारवाई करावी. रामदास तडस केंद्रात खासदार म्हणून काम करतात. घरातल्या सुनेसोबत असे वागत असाल, तर हे निंदयनीय आहे, असं देखील त्या म्हणाल्या आहेत.

 

Web Title : Rupali Chakankar | bjp mp ramdas tadas daughter in law beaten by family ncp rupali chakankar

 

हे देखील वाचा :

MP Sambhaji Raje | खा. संभाजीराजेंचा राज्य सरकारला इशारा; म्हणाले – ‘…तर त्याला मी जबाबदार राहणार नाही’

Nandurbar News | अर्ध्यावरच प्रवास थांबला ! दरड कोसळल्याने घाट बंद, उपचारासाठी पत्नीला खांद्यावर घेऊन जात असताना पत्नीचा वाटेतच दुर्दैवी मृत्यू

Crime News | एकटीला बघुन रुममध्ये घुसला अन्.., महिला IPS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत केलं विकृत कृत्य

 

Related Posts