IMPIMP

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करू नये यासाठी आता काय राहिलंय?’, चंद्रकांत पाटलांचा टोला

by pranjalishirish
Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil comment on strategy of home minister amit shah for bjp victory in assam

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन : राज्यातील विविध प्रकरणावरून ठाकरे सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. त्यानंतर आता ही मागणी पुन्हा जोर धरू लागत आहे. ‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करू नये यासाठी काय राहिले आहे. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी आणखी काय-काय लागते ? याबाबत तज्ज्ञांनी सांगावे’, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil  यांनी केले आहे.

माझे मौन हे कुणी कमजोरी समजू नये’, दवेंद्र फडणवीस सरकारवर कडाडले

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. खुद्द गृहमंत्र्यांवर अशाप्रकारे आरोप झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्यासह राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जात होती. त्यानंतर आता निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी पत्र लिहित परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या सर्व घडामोडीनंतर चंद्रकांत पाटील Chandrakant Patil  यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

‘खंडणीचे आरोप निराधार, माझी नार्को टेस्ट करा’ ! परब यांचे आव्हान

ते म्हणाले, ‘राठोड झाले, देशमुख झाले आणि परबांचे नाव आले आहे. ही संघटित गुन्हेगारी आहे. या संघटित गुन्ह्याचे पुरावे कागदपत्रात आले तर या सर्वांवर मोक्का लावावा. सचिन वाझे हे महाविकास आघाडी सरकारला किती प्रिय आहेत, ते विधानसभा अधिवेशनावेळी दिसले. वाझे प्रकरणात 9 वेळा विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. सर्वसामान्य माणूस सरकारच्या या प्रकाराला वैतागला आहे’.

‘राज्यात कठोर निर्बंध आवश्यक’, शरद पवारांनी जनतेला केले ‘हे’ आवाहन (व्हिडीओ)

दरम्यान, ‘कोरोनात भ्रष्टाचार करणार. हप्ते वसुली करणार आणि केंद्राकडे बोट दाखवणार. केंद्राने काय-काय दिलं हे उघड आहे. मी राष्ट्रपती राजवटीची मागणी करत नाही. मात्र, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करू नये, यासाठी काय राहिले आहे, असेही चंद्रकांत पाटील  Chandrakant Patil यांनी सांगितले.

Read More : 

Mini Lockdown : ‘सरकारने आनंदाने लॉकडाऊन लावला नाही, ही नामुष्की ओढवली’, निर्बंधावर राऊतांचे ‘कडक’ मत

चित्रा वाघ-रुपाली चाकणकर यांच्यात रंगला ‘कलगीतुरा’ !

परमबीर सिंग NIA च्या कार्यालयात ! सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार

‘मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांवर नियंत्रण नाही, आता राजीनाम्यासाठी रांग लागेल’, केंद्रीय मंत्र्याचा दावा

‘त्या’ वक्तव्यावरुन संजय निरुपम यांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले -‘बहिरा नाचे आपन ताल…’

‘खा. प्रताप पाटील-चिखलीकरांची माणसे निवडून देऊ नका, भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल’; भाजपमधील गटबाजी उघड

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज शरद पवारांची भेट घेणार

पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचे ‘स्टार’ प्रचारक कोरोनाबाधित

आ. शिवेंद्रराजे यांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘Lockdown लावून प्रशासनाकडून मोगलाई’

Coronavirus : न्यूझीलंडने भारताबाबत घेतला मोठा निर्णय, 28 एप्रिलपर्यंत ‘नो एंट्री’

Chitra Wagh : ‘ही मंडळी भ्याडच म्हणावी लागतील’

सचिन वाझेंच्या पत्रावरून फडणवीस म्हणाले; ‘पत्र गंभीर…’

Related Posts