IMPIMP

sakshana salgar | राष्ट्रवादी युवती सेल आक्रमक, म्हणाल्या – ‘…तर पडळकरांच्या बगलबच्चांना घरात घुसून मारू’

by bali123
sakshana salgar | smita deshmukh criticizes mla gopichand padalkar activist over sakshana salgar case satara

सातारा न्यूज (Satara News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) sakshana salgar | राष्ट्रवादी युवती सेलच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर (sakshana salgar) यांना आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांच्या कार्यकर्त्याने फोनवरून धमकी देत अत्याचार करून मारून टाकण्याची धमकी दिली आहे. त्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. ठिकठिकाणी या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. साताऱ्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती सेलच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला आहे. यावेळी राष्ट्रवादी युवती सेलच्या प्रदेश सचिव स्मिता देशमुख (Nationalist Yuvati Cell State Secretary Smita Deshmukh) यांनी पत्रकार परिषद घेत सलगर यांना दिलेल्या धमकीचा आम्ही निषेध करतो. राष्ट्रवादीच्या महिला, युवती अशा धमक्यांना घाबरणार नाहीत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाघिणी आहोत. अशा बगलबच्चांना घरात घुसून मारू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

स्मिता देशमुख म्हणाल्या, सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्याला राजकारणही अपवाद नाही. प्रत्येकाला स्वत:चे मत मांडण्याचा अधिकार आहे. पडळकरांचे बगलबच्चे आमच्याकडून हा अधिकार हिरावून घेऊ शकत नाहीत. अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) , खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule), उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी आम्हाला लढण्याची ताकद दिली आहे. महाविकास आघाडीत महिला सुरक्षित आहेत. केवळ प्रसिद्धीसाठी पवार साहेबांविषयी गोपीचंद पडळकर बोलतात. मला एवढंच सांगायचं आहे कि हे प्रकार थांबवा. सर्व महिला, युवती पेटून उठल्या असून अत्याचाराची भाषा आम्ही खपवून घेणार नसल्याचे देशमुख म्हणाल्या.

Web Titel :  sakshana salgar | smita deshmukh criticizes mla gopichand padalkar activist over sakshana salgar case satara

Related Posts