IMPIMP

भिडेंच्या वक्तव्याची चौकशी करुन कारवाई करणार, जयंत पाटांचा इशारा

by pranjalishirish
Sambhaji Bhide statement will be investigated says guardian minister jayant patil in sangli

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन – संभाजी भिडे Sambhaji Bhide  हे वादग्रस्त वक्तव्यकरुन कोरोना सारख्या आपत्तीच्या काळात राज्य सरकार आणि समाज यांच्यात बाधा करत आहेत. त्यांच्या वक्तव्याचा तपास करुन योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिला

Nitesh Rane : ‘सरकारने कुठलाही त्रास दिला तर संघर्ष अटळ

संभाजी भिडे Sambhaji Bhide  यांनी चार दिवसांपूर्वी कोरोना हा रोग नाही, कोरोनाने जी माणसे मरतात, ती जगण्याच्या लायकीचे नाहीत, मुळात कोरोना हा रोगच नाही, हा गांडू वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, हा मानसिक रोग आहे, त्याने काहीही होत नाही, असे वादग्रस्त विधान केले होते. या वक्तव्यावर जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांना कोरोना झाला आहे. कोरोना बाबतीत अशा वाक्याचा वापर करणे हा निषेधार्ह असून चुकीचे असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

‘महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत जनतेने का मोजावी ?’

कोरोना हे देशावरील मोठे संकट आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी यंत्रणा प्रयत्न करीत आहे. मात्र, भिडे Sambhaji Bhide  अशी विधाने करुन कामामध्ये अडथळा आणत आहेत, अशा विधानांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे. आंबा खाल्ल्याने मुलगा होतो, अशी विधाने करणे अयोग्य आहे. एरव्ही अशी वक्तव्ये खपून जातात. पण सध्य परिस्थितीत अशा वक्तव्यामुळे कोरोनासारख्या संकटाचे गांभीर्य कमी होते.

‘हा’ केंद्र सरकारचा अमानुषपणा आहे, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात

देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. कोरोनाबाबत काळजी घेण्यासाठी पंतप्रधानांपासून सर्वजण सांगत आहेत. मात्र, काहीतरी विधाने करुन बाधा आणणाऱ्या वक्तव्यांची चौकशी करुन कारवाई करण्यात आली पाहिजे. अशी वक्तव्ये भिडे यांनी यापुढे करु नयेत, असे जंयत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकरांशी बोलताना सांगितले.

Read More : 

जयंत पाटलांनी घेतला संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा समाचार, सर्वत्र जोरदार चर्चा

सचिन वाझे प्रकरणावरुनही उदयनराजे आक्रमक, म्हणाले, ‘हा कोण वाझे…’

संजय राऊतांनी फडणवीसांना दिला सल्ला, म्हणाले – ‘प्रसंग बाका, सरकार कोणाचं हे पाहू नका, दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्या’

15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात

Balasaheb Thorat : ‘राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्व देत नाही’

राज्यात 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण Lockdown ? मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर
होऊ शकतो निर्णय

खा. विनायक राऊतांचा राणेंवर ‘निशाणा’, म्हणाले – ‘कोकण सम्राटां’ नी चिपी विमानतळाचं कंत्राट दळभद्री कंपनीला देऊन वाट लावली

Related Posts