IMPIMP

Sanjay Raut | ‘उद्धव ठाकरेंनी थोबाडीत मारली तरी सत्ता सोडणार नाही’, भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडून खळबळजनक वक्तव्य, राऊतांनी केला हल्लाबोल

by nagesh
Shivsena Vs BJP | i have heard chandrakant patil will be governor nagaland my best wishes him says sanjay raut

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) एका नेत्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. उद्या भर चौकात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आमच्या थोबाडीत जरी मारली तरी आम्ही सरकारमधून बाहेर पडणार नाही असे मला कॅबिनेटमधील (Cabinet) वरिष्ठ मंत्र्याने सांगितलं, असं खळबळजनक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना केलं. यावर आज शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटलांनी हवेत गोळीबार करु नये, कोण मंत्री त्याच नाव सांगा, पाटलांना अफवा पसरवण्याची सवयच असल्याचे सांगत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हल्ला चढवला आहे.

 

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले होते की, इतकंच काय तर, इतक्या अनपेक्षितपणे आम्हाला सत्ता मिळाली आहे. याची आम्हाला कल्पानाही नव्हती. एवढी अनपेक्षितपणे मिळालेली सत्ता आम्ही घालवू कशी ? असंही कॅबिनेटमधील वरिष्ठ मंत्री मला म्हणाले, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पाटील यांनी हे वक्तव्य नेमकं कोणत्या मंत्र्याबाबत केलं आहे याचा अंदाज बांधणं कठिण आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मंत्र्याचे नाव सांगा

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी हवेत गोळीबार करु नये.
कोण मंत्री त्याचं नाव सांगावं. पाटलांना अफवा पसरवण्यात आनंद मिळतो, असं संजय राऊत म्हणले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार हल्ला चढवला.

एक मंत्री कोण? असा हवेत गोळीबार करुन चालणार नाही आणि कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाहीत.
चंद्रकांत पाटील किंवा अन्य कुणी अशा अफवा पसरवत असतात. त्यांना आनंद मिळतो.
त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. पण महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi Government) तीन वर्षे चालेल.
त्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. त्याबाबत त्यांनी निश्चित रहावं, असा टोला लगावला.

 

Web Title : Sanjay Raut | chandrakant patil sensational statement about mahavikas aghadi government minister reaction by sanjay raut

 

हे देखील वाचा :

Insecure Apps | ‘गुगल प्ले’वर 19 हजारपेक्षा जास्त अ‍ॅप असुरक्षित, अतिशय खासगी माहिती होऊ शकते सार्वजनिक; सुरक्षेचे ‘हे’ 5 उपाय लक्षात ठेवा, जाणून घ्या

CoWin पोर्टलद्वारे आता दुसर्‍यांच्या व्हॅक्सीनेशनची सुद्धा मिळेल माहिती, आरोग्य मंत्रालयाने लाँच केले नवीन फीचर; जाणून घ्या

SBI ग्राहकांसाठी अतिशय महत्वाची बातमी, लवकर करा ‘हे’ कामे, अन्यथा…

 

Related Posts