IMPIMP

‘सचिन वाझे, परमबीर यांनी जे केलं तेच देशमुखांनी कारावे, शरद पवार, उद्धव ठाकरेंनी वसुली करण्याचे सांगितलं असं थेट सांगावं’

by pranjalishirish
sharad pawar and uddhav thackeray have asked recovery bjp kirit somaiya target anil deshmukh

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- परमबीर सिंह Parambir Singh  यांनी अनिल देशमुख Anil Deshmukh यांनी 100 कोटी वसुल करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मुंबई उच्च न्यायालयाने आरोप गंभीर असल्याचा ठपका ठेवत या आरोपांची चौकशी सीबीआयला करण्यास सांगितले. तसेच चौकशीचा अहवाल 15 दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले. यात काही तथ्य आढळल्यास एफआयआर नोंदवण्यात येणार आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले असताना विरोधकांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे.

चंद्रकांत पाटलांचे मोठं वक्तव्य, म्हणाले – ‘कुणाच्या कुबड्या न घेता 2024 मध्ये स्वबळावर सरकार स्थापन करणार, आणि…’

अनिल देशमुख Anil Deshmukh  यांनी राजीनामा दिल्यानंतर तातडीने कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी दिल्ली गाठली आहे. मुंबई उच्च न्यायालायने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख हे सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची तयारी करत आहेत. यातच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सचिन वाझेंनी जे केले, परमबीर सिंह  Parambir Singh यांनी जे केले, तेच अनिल देशमुख यांनी करावे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी वसुली करण्यास सांगितलं असं थेट सांगावं. यात आणखी चार लाभार्थ्यांची नाव बाहेर येतील. माझ्याकडे याचे पुरावे आहेत, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. तसेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे सीबीआय चौकशीला का घाबरतात ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. असे वृत्त एका वृत्तवाहीनीने दिले आहे.

‘देशानं पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवतात अन् गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं’

देशाने ‘हे’ पहिल्यांदाच पाहिले

अनिल देशमुख यांच्या प्रकरणावर भाष्य करताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, अनिल देशमुख यांच्या राजीनामुळे उद्धव ठाकरे सरकारचं पितळ उघडं पडलं. देशाने पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवताना आणि गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं आहे, असा टोला महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

मोठी बातमी ! अजित पवार, हसन मुश्रीफ यांना मिळाली ‘ही’ नवी खाती

सरकार कार्यकाळ पूर्ण करणार नाही

अनिल देशमुख  Anil Deshmukh यांच्या राजीनाम्यावरुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना रामदास आठवले म्हणाले, गृहमंत्री अनिल देशमुख यांना यापूर्वी राजीनामा देण्याची गरज होती. मात्र, त्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, आता शरद पवार यांनी अनिल देशमुखांना राजीनामा देण्यास परवानगी दिली ही चांगली बाब आहे, असे रामदास आठवले म्हणाले. आता असे वाटू लागले आहे की, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण  करु शकणार नाही, असेही आठवले म्हणाले.

Read More : 

राज ठाकरेंचं ‘ते’ भाकीत खरं ठरणार?

अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद – मनपा आयुक्त विक्रम कुमार

मुंबई पोलिस काहीच करत नव्हते; देशमुखांच्या राजीनाम्यानंतर किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया

‘आता किमान समान कार्यक्रम म्हणून तिसऱ्या विकेटसाठी काँग्रेसला संधी हवी, अन्याय होऊ नये’, भाजपचा टोला

उदगीर पंचायत समितीच्या इमारतीसाठी 10 कोटींचा निधी मंजूर – राज्यमंत्री संजय बनसोडे

‘अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 100 कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरु, CBI ने कारवाई करावी’

Related Posts