IMPIMP

शरद पवारांची केंद्र सरकारसोबत चर्चा, केंद्र सरकारने दिले ‘हे’ आश्वासन

by pranjalishirish
sharad pawar central government talks maharashtra sharad pawar talks delhiites

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक बनली असताना राज्यात पुढील तीन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. यापार्श्वभूमीवर त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे राज्याला आठवड्याला 40 लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. यानंतर लसीच्या मुद्यावरुन राज्य सरकार आणि केंद्र सरकार आमने-सामने आले असून डॉ. हर्षवर्धन यांनी परिपत्रक शेअर करुन महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar  यांनी केंद्र सरकार आणि आरोग्य खाते महाराष्ट्राच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

Pandharpur : दोन दिवसांत सकारात्मक निर्णय घेणार, अजित पवारांचे व्यापाऱ्यांना आश्वासन

शरद पवार Sharad Pawar  यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले. तसेच गंभीर व भयावह स्थिती लक्षात घेऊन या स्थितीला धैर्याने, सामूहिकपणे आपण सामोरे गेले पाहिजे त्याला आता पर्याय राहिलेला नसल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी समाजातील सर्व घटक, कष्टकरी, शेतकरी, व्यापारी व इतर घटकांना विनंती केली की, आपल्याला वास्तव नाकारून चालणार नाही. जनतेच्या जिवितासाठी, सुरक्षिततेसाठी राज्य सरकारला अपरिहार्य निर्णय घ्यावे लागत आहेत. त्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.

‘खंडणीचे आरोप निराधार, माझी नार्को टेस्ट करा’ ! परब यांचे आव्हान

शरद पवार Sharad Pawar  यांनी पुढे म्हटले की, राज्य सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करतेय त्याच प्रमाणे केंद्रसुद्धा या संकटातून राज्याला मदत करण्यासाठी पूर्णपणे सहकार्याची भूमिका घेत आहे, असे सांगताना त्यांनी कालच देशाच्या आरोग्य मंत्र्यांशी संपर्क साधला असल्याचे सांगितले. ज्या कमतरता आहेत याबाबत चर्चा केली. त्यांनी या सर्व संकटात केंद्र सरकार व आरोग्य खातं पूर्ण शक्तीने सर्व राज्यांच्या पाठीशी आहे. महाराष्ट्र सरकारच्याही पाठिशी आहे. त्यामुळे त्यांची मदत व आपल्या सर्वांचा सामूहिक प्रयत्न यातून मार्ग काढायचा आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

माझे मौन हे कुणी कमजोरी समजू नये’, दवेंद्र फडणवीस सरकारवर कडाडले

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारला काही कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत. केंद्र सरकारही या संबंधी आग्रही आहे. केंद्र सरकार राज्याला सहकार्य करण्यास तत्पर आहे. तसेच केंद्र सरकारनेही या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कठोर पावलं टाकण्याची गरज असल्याचे स्पष्ट केलं आहे. या परिस्थीतमध्ये सर्वसामान्य नागरिक आणि समजातील सर्व घटक इतर साऱ्या गोष्टी बाजूला ठेऊन एकत्र येतील असा माला विश्वास असल्याचे शरद पवार यांनी आपल्या संवादादरम्यान सांगितलं.

Read More : 

Coronavirus : न्यूझीलंडने भारताबाबत घेतला मोठा निर्णय, 28 एप्रिलपर्यंत ‘नो एंट्री’

Chitra Wagh : ‘ही मंडळी भ्याडच म्हणावी लागतील’

सचिन वाझेंच्या पत्रावरून फडणवीस म्हणाले; ‘पत्र गंभीर…

Chandrakant patil : ‘केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी ठोक ठोक ठोकलंय’

संभाजी भिडे यांची जीभ घसरली, म्हणाले – ‘कोरोना अस्तित्वात नाही, जे जगायचे ते जगतील अन् मरायचे ते मरतील’

महाराष्ट्रापेक्षा गुजरातला लसीचा पुरवठा अधिक, राजेश टोपेंचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

‘महाराष्ट्राला सर्वात जास्त लसी मिळायला हव्यात, मात्र मुद्दाम दिल्या जात नाहीत’, जयंत पाटलांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

Related Posts