IMPIMP

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

by pranjalishirish
shivsena saamna editorial pm narendra modi bangladesh independence

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi हे नुकतेच बांगलादेशाचा दौरा करुन परले आहेत. बांगलादेशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान बांगलादेशात गेले होते. त्यावेळी त्यांनी अनेकांच्या भेटीगाठी घेऊन नागरिकांशी संवाद साधला. एका कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात आपण भाग घेतला होता, असे वक्तव्य केले. पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यानंतर देशात चर्चा रंगू लागली आहे. मोदींच्या या वक्तव्याचा आधार घेत शिवसेनेने मोदींना स्वातंत्र्यसैनिकाचा ताम्रपट द्यायला हवा, अशी वेगळीच मागणी केली केली. शिवसेनेने ही मागणी सामनाच्या संपादकीयमधून केली आहे.

सरकार स्थापनेवर भाजपच्या बड्या नेत्याचे विधान; ‘आता वरून कसा आदेश येतो ते पाहायचे’

शिवसेनेने म्हटले आहे की, इंदिरा गांधींच्या शौर्यामुळे, पराक्रमामुळे बांगलादेशची निर्मिती झाली. इंदिरा गांधी यांनी युद्ध पुकारुन पाकिस्तानची सरळ फाळणीच केली. त्यानंतर असं शौर्य कोणत्याही पंतप्रधानांना गाजवता आलं नाही. त्या बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यात आपलाही सहभाग होता, असं विधान मोदी  Narendra Modi यांनी बांगलादेशाच्या भूमीवर जाऊ केलं, हे आश्चर्यच आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. मोदी सांगतात ते खरेच मानायला हवे, अशी आजची स्थिती आहे. पण पश्चिम बंगालमधील निवडणुकांसाठी इतका खटाटोप करावा लागेल व प्रकरण बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यतील सहभागापर्यंत पोहोचेल असे वाटले नव्हते, असा चिमटा शिवसेनेनं काढला आहे. तसेच बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदी यांचा गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा, अशी मागणीच शिवसेनेने केली आहे.

आनंद महिंद्रांचा Lockdown बाबत ठाकरे सरकारला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले – ‘त्या’वर पुन्हा लक्ष केंद्रीत करूयात’

मोदींमुळे बांगलादेशातील हिंदू असुरक्षित

मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्याने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मतांचा चढउतार किती होईल हे आजच सांगता येणार नाही, पण मोदींचा दोन दिवसांचा बांगलादेश दौरा संपल्यावर तेथील धर्मांध मुसलमानांनी दंगली सुरु केल्या आहेत. कट्टरतावादी इस्लामी गटांनी हिंदू मंदिरांची दोडफोड केली आहे. हिंदू वसाहतींवर हल्ले सुरु झाले आहेत. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत 12 जण ठार झाले आहेत. हे आहे मोदींच्या बंगालादेश दौऱ्याचे फलित. पंतप्रधान मोदी Narendra Modiबांगलादेशात जाऊन आले, मात्र, तेथील हिंदू अधिक असुरक्षित झाला, असे शिवसेनेनं म्हटले आहे.

CM ठाकरेंचे मुख्य सचिवांना आदेश, म्हणाले – ‘Lockdown ची तयारी करा’

मोदींनी पुन्हा बांगलादेशा जायला पाहिजे

पंतप्रधान मोदी ढाक्याला गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यासाठी गेले. पण तेथे शांततेची होळीच पेटली. मोदींनी जोगेश्वरी मंदिरात जाऊन पूजा केली, पण आता तेथील मंदिरेच तोडण्यात आली याची तर्कसंगती कशी लावणार ? शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोदींनी पुन्हा बांगलादेशात जायला हवे, हाच एक उपाय, असं शिवसेनेने म्हटले आहे.

Also Read:

भाजप नगरसेविकेच्या मुलाची आत्महत्या, तपास सुरु

लस घेऊनही शेकापचे आमदार जयंत पाटील ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

राष्ट्रवादीसोबत जाणार का ?, त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात…

भाजपकडून ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले – ‘शिवसेनेनं आपलं पाप उघड होईल, म्हणून मिठी नदी साफ केली नाही’ (व्हिडीओ) 

Related Posts