IMPIMP

सुप्रिया सुळेंनी चिमटा काढत केलं मोदी सरकारचं अभिनंदन !

by pranjalishirish
small savings scheme interest rates ncp leader supriya sule tweets over decision of interest rates order

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन-  मोदी सरकारनं अल्पबचत योजनांवरील व्याजदराच्या निर्णयावरून यु-टर्न नंतर आता त्यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. अनेकांनी या भूमिकेवरून आणि चुकीवरून सरकारवर निशाणा साधला आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही मोदी सरकारच्या यु-टर्नच्या भूमिकेवरून चिमटा काढला आहे. इतकंच नाही तर त्यांनी सरकारचं अभिनंदन देखील केलं आहे.

शिवेंद्रराजेंना मोठा राजकीय, सामाजिक वारसा’, त्यांचा भविष्यकाळही उज्ज्वल, मी आयुष्यभर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन’ – रामराजे निंबाळकर

सुप्रिया सुळे  Supriya Sule यांनी ट्विट करत याबाबत भाष्य केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये त्या लिहितात, अल्पबचतीवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय सरकारनं तातडीनं फिरवला. सरकारचं याबद्दल अभिनंदन. यामुळं सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला. आता केंद्र सरकारनं अशीच तत्परता दाखवत पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस यांवर लादलेली मोठी दरवाढ देखील तात्काळ मागे घ्यावी ही विनंती असंही सुळे Supriya Sule  यांनी म्हटलं आहे.

वडिल राजेंद्र पवारांना ‘कृषीरत्न’ जाहीर होताच पुत्र आमदार रोहित यांचे ‘हे’ ट्विट चर्चेत

रात्री आदेश अन् सकाळी सारवासारव

केंद्रीय अर्थमंत्रालयानं बुधवारी रात्री सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील अर्थात पीएफसह अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा आदेश काढला होता. यानंतर अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना धक्का बसला. त्यावरून टीकाही झाली. यानंतर काही तासात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी सकाळीच याबाबत खुलासा करत सारवासारव केली आणि हा आदेश चुकीनं काढला गेला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Also Read:

गृहमंत्री देशमुखांवर 100 कोटीच्या हप्ता वसुलीचा आरोपानंतर आता चौकशी समितीवरून ‘कलगीतुरा’, सत्ताधारी-विरोधक ‘आमनेसामने’

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका ! ‘हा’ ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज IPL च्या बाहेर

Farmers Protest : सर्वोच्च न्यायालयीन समितीची 18 राज्यातील 85 शेतकरी संघटनांसोबत चर्चा, अहवाल सुप्रीम कोर्टात सादर; लवकरच होणार सुनावणी

निवडणुकीच्या भीतीमुळे मोदी-शहा सरकारने निर्णय बदलला’, PPF वरील व्याजदर जैसे थे !

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे स्पष्टीकरण, म्हणाल्या – ‘PPF वरील व्याजदर जैसे थे, तो आदेश नजरचुकीने निघाला’

Lockdown ला विरोध करणाऱ्यांना संजय राऊतांनी सुनावले, म्हणाले -‘लॉकडाऊनचे राजकारण करु नका’

खा. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रराजे यांच्यात कास धरणाच्या निधीवरून ‘श्रेय’ वाद, जाणून घ्या नेमकं प्रकरण

Related Posts