IMPIMP

‘महाराष्ट्राला सर्वात जास्त लसी मिळायला हव्यात, मात्र मुद्दाम दिल्या जात नाहीत’, जयंत पाटलांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

by pranjalishirish
some people in delhi seem to want the public health system in maharashtra not to work properly jayant patil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात कोरोना संसर्ग वाढत असताना राज्यातील लसीकरण केंद्र लस उपलब्ध नसल्याने बंद करावे लागले आहे. यावरून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil  यांनी महाराष्ट्राला होणाऱ्या लसींच्या पुरवठ्यावरुन केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या जास्त असताना महाराष्ट्राला लसींचा पुरवठा जास्त होणे गरजेचे असताना मुद्दाम पुरवठा केला जात नसल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

माझे मौन हे कुणी कमजोरी समजू नये’, दवेंद्र फडणवीस सरकारवर कडाडले

जयंत पाटील Jayant Patil  यांनी ट्विटरवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधताना गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, देशात रुग्णांची संख्या सर्वात जास्त महाराष्ट्रात असताना सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळालयला हव्यात, मात्र तसे मुद्दाम होऊ दिले जात नाही. महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट चालू नये अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा दिसते, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

‘खंडणीचे आरोप निराधार, माझी नार्को टेस्ट करा’ ! परब यांचे आव्हान

केंद्र सरकारचे पहिल्यापासून मर्यादित सहकार्य

ते पुढे म्हणाले, स्वातंत्र्योत्तर काळात कधीच न पाहिलेले संकट महाराष्ट्र मागील वर्षापासून पाहत आहे. महाराष्ट्राचे आरोग्य खाते, आरोग्यमंत्री राजेश टोपे व इतर संपूर्ण प्रशासन पूर्ण ताकदीने केंद्र सरकारचे पहिल्यापासून मर्यादित सहकार्य असताना या संकटाचा मुकाबला करत आहेत. महाराष्ट्राची लोकसंख्या 12.30 कोटी असताना महाराष्ट्राला 85 लाख लसी मिळाल्या. राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 4.73 लाख इतकी आहे. तर गुजरातची लोकसंख्या 6.50 कोटी असताना गुजरातला 80 लाख लसी मिळाल्या. त्या ठिकाणी अॅक्टिव्ह रुग्ण केवळ 17 हजार असल्याचे सांगत महाराष्ट्राला मुद्दाम लसींचा पुरवठा कमी केला जात असल्याचा आरोप जयंत पाटील Jayant Patil  यांनी केला आहे.

‘राज्यात कठोर निर्बंध आवश्यक’, शरद पवारांनी जनतेला केले ‘हे’ आवाहन (व्हिडीओ)

राज्याला बदनाम करण्याचे प्रयत्न

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी काल प्रसारित केलेल्या पत्रकातून फक्त महाराष्ट्राविषयी द्वेष प्रतीत होत आहे. केवळ महाराष्ट्रात विरोधी विचारांचे सरकार असल्याने महाराष्ट्राला सहकार्य न करण्याची दिल्लीची भूमिका दिसत आहे. असा आरोप पाटील यांनी केला. कदाचीत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना महाराष्ट्राची पूर्ण माहिती नाही किंवा त्यांना अपूर्ण माहिती दिली गेली. महाराष्ट्राची लोकसंख्या, रुग्ण संख्या, किती लस उपलब्ध झाल्या या प्रश्नांची शहानिशा करण्यापूर्वीच परिपत्रक काढून राज्याला बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत का ? अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

Read More : 

Coronavirus : न्यूझीलंडने भारताबाबत घेतला मोठा निर्णय, 28 एप्रिलपर्यंत ‘नो एंट्री’

Chitra Wagh : ‘ही मंडळी भ्याडच म्हणावी लागतील’

सचिन वाझेंच्या पत्रावरून फडणवीस म्हणाले; ‘पत्र गंभीर…

Chandrakant patil : ‘केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी ठोक ठोक ठोकलंय’

संभाजी भिडे यांची जीभ घसरली, म्हणाले – ‘कोरोना अस्तित्वात नाही, जे जगायचे ते जगतील अन् मरायचे ते मरतील’

महाराष्ट्रापेक्षा गुजरातला लसीचा पुरवठा अधिक, राजेश टोपेंचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

Related Posts