IMPIMP

विहिंपनं व्यक्त केला संताप, म्हणाले – ‘ट्विटर ईस्ट इंडिया कंपनी सारखं वागायला लागलंय, इथूनच पैसा कमावायचा अन् …’

by omkar
Twitter ईस्ट इंडिया कंपनी सारखं वागत आहे,' विहिंपचा संताप

सरकारसत्ता ऑनलाइन – केंद्र सरकार आणि ट्विटर (Twitter ) यांच्यातील वाद वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. ट्विटरकडून केल्या जात असलेल्या कारवाईचा निषेध केला जात आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू ( Vice President Venkaiah Naidu) यांच्या Twitter अकाऊंटवरील ब्ल्यू टिक हटवल्यानंतर आता ट्विटरने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या अकाऊंटची ब्ल्यू टिक हटवली आहे.
दरम्यान भागवत यांच्या Twitter हॅण्डलवरील ब्लू टीक हटवल्याने विश्व हिंदू परिषदेने तिव्र शब्दात नाराजी व्यक्त करत ट्विटरची तुलना थेट ईस्ट इंडिया कंपनीशी केली आहे. ट्विटर ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे वागत आहे. इथूनच पैसा कमावायचा आणि इथल्याच लोकांवर बंदी आणायची.
भारताच्या एकतेला, स्वाधिनतेला आव्हान देणाऱ्या तसेच भारतावर हल्ला करणाऱ्यांना आसरा देण्याचे काम Twitter करत असल्याचा आरोप परीषदेने केला आहे.

पुण्यात शिवसेना 80 जागांवर लढणार – संजय राऊत

विहिंपचे प्रवक्ते विनोद बंसल यांनी ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट केले आहेत.
यात त्यांनी ट्विटरची धोरण ही व्यक्तीच्या विचारसणीनुसार वेगवेगळी आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
तसेच ट्विटरला त्यांनी भारतीय तुम्हाला जसे आपले करू शकतात.
तसे नाकारू देखील शकतात, असे म्हटले आहे.
कधी राष्ट्रवादी विचारसणी असणाऱ्या लोकांचे ट्विट अकाऊंट सस्पेंड करणं, कधी त्यांच्या ब्लू टीक काढण, फॉलोअर्स कमी करणे, नोटीस पाठव असे उद्योग ट्विटर करत आहे.
हा मनमानी कारभार किती दिवस चालणार आहे? जे लोक देशाविरोधात बोलतात.
जे लोकांविरोधात देशद्रोहाच्या गुन्ह्याअंतर्गत खटले सुरु आहेत त्यांचे ट्विटर अकाऊंट तर तुरुंगात असतानाही व्हेरिफाय होतात असे बंसल यांनी म्हटले आहे .
जिहादी लोकांसाठी वेगळी धोरण, हिंदूंसाठी वेगळी धोरण अस होता कामा नये.
मला वाटतं की ट्विटरने आपल्या धोरणांबद्दल विचार केला पाहिजे.
नाहीतर भारतीय लोक ज्यापद्धतीने अशा गोष्टी स्वीकारतात त्याच पद्धतीने ते या गोष्टी सोडण्याबद्दलही चांगल्याप्रकारे जाणतात असा इशाराही बंसल यांनी दिला आहे.

Also Read:- 

Ajit Pawar : ‘…तो पर्यंत कोणी मायेचा लाल महाविकास सरकार पाडू शकणार नाही’

Pravin Darekar : ‘… तर सरकार कधी कोसळेल हे देखील त्यांना कळणार नाही’

‘राज-उद्धव’ एकत्र येणार ?, खा. संजय राऊत म्हणाले…

Devendra Fadnavis : उत्तरप्रदेशातील गंगेतील मृतदेहांची महाराष्ट्रात चर्चा होते, पण…

Ajit Pawar : ‘प्री-वेडिंग’ शूटच्या माध्यमातून पर्यटन विकास साधा !

शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचे नवं ट्वीट

Dark Mode : डार्क मोडमध्ये कधीही वापरू करू नका स्मार्टफोन, जाणून घ्या कारण

 

Related Posts