IMPIMP

Vanchit Bahujan Aghadi | ‘वंचित’चा पहिला उमेदवार जाहीर! बुलढाण्यातून ‘या’ जुन्या-जाणत्या नेत्याला उमेदवारी, मविआतून बाहेर पडण्यावर शिक्कामोर्तब?

by sachinsitapure

बुलढाणा : वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडीसोबतची (Mahavikas Aghadi) बोलणी फिस्कटल्याचे प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) जाहीर केले होते, तसेच वंचित (VBA) आणि ठाकरे गटाची (Shivsena UBT) युतीदेखील तुटल्याचे आंबेडकर यांनी म्हटले होते. आता धक्कातंत्राचा वापर करत प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून जुनेजानते नेते वसंत मगर (Vasant Magar) यांना उमेदवारी दिली आहे.

वंचितने काल रात्री पार पडलेल्या राज्य समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला आणि आज त्याची घोषणा केली. हा वंचितचे विरोधक आणि स्वपक्षीय यांना मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान या उमेदवारीतून वंचितने मागील निवडणुकीतील सोशल फॉम्र्युला वापरण्याचे संकेत दिले आहेत.

कोण आहेत वसंत मगर

* शिवसेनेतून राजकीय क्षेत्रात पदार्पण.
* छगन भुजबळ यांच्यामुळे त्यांना १९९० मध्ये सिंदखेडराजा विधानसभेची उमेदवारी मिळाली.
* १९९५ मध्ये भारिप बमसंकडून सिंदखेडराजा विधानसभेची निवडणूक लढविली.
* सध्या ते राजकारणापासून अलिप्त होते. वंचितच्या उमेदवारीमुळे पुन्हा चर्चेत आले.

Pune Ambegaon Crime | पुणे : संतापजनक! रोडरोमियोच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

Related Posts