IMPIMP

पंढरपूर : देवेंद्र फडणवीस आक्रमक, म्हणाले – ‘…तर माझं नाव बदलून टाका’ (Video)

by pranjalishirish
video bjp devendra fadnavis target thackeray government pandharpur election campaign

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन : पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis  यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. ‘पंढरपूर परिसरात निवडणूक असल्यामुळे वीज कनेक्शन कापण्यात येत नाही. मात्र, 17 तारखेनंतर जर पंढरपूर मतदारसंघात सरकारने वीज कनेक्शन कापले नाही तर माझे नाव बदलून टाका’, असे ते म्हणाले.

Nitesh Rane : ‘सरकारने कुठलाही त्रास दिला तर संघर्ष अटळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाने पंढरपूर मतदारसंघातील रिक्त जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीत भाजपकडून समाधान आवताडे तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून भगिरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता या दोन्ही उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. आवताडे यांच्या प्रचारासाठी आलेल्या फडणवीस Devendra Fadnavis  यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

‘महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत जनतेने का मोजावी ?’

ते म्हणाले, भाजपने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गदारोळ केल्यानंतर वीज कनेक्शन कापणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर शेवटच्या दिवशी वीज कनेक्शन कापण्यावरील स्थगिती उठवली. हे सरकार लबाड आहे. तसेच पंढरपूर परिसरात पोटनिवडणूक आहे. त्यामुळे इथलं वीज कनेक्शन कापण्यात येत नाही. मात्र, 17 तारखेनंतर पंढरपूर मतदारसंघातील वीज कनेक्शन कापले जाईल. जर तसे झाले नाही तर माझे नाव बदलून टाका, असेही ते म्हणाले.

‘हा’ केंद्र सरकारचा अमानुषपणा आहे, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात

दरम्यान, लोकहितविरोधी सरकारविरोधात मतदान करा. पंढरपूर पोटनिवडणूक ही जनतेसाठी एक संधी आहे. हे महाविकास आघाडी सरकार नाही तर महावसूली सरकार आहे. शेतकऱ्यांकडून, पोलिसांकडून आणि जनतेकडून वसूली करण्यासाठी सरकार काम करत आहे. महाराष्ट्रात लोकशाही नव्हे तर लॉकशाही सुरू आहे. हे आवश्यक असले तरी जेव्हा लॉकडाऊन करतो तेव्हा जे लोक रोजंदारीवर जगतात. अशा सामान्य लोकांना मदत करण्यासाठी तिजोरीत हात घातला पाहिजे. अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्याचं भान सरकारला नाही, असेही फडणवीस Devendra Fadnavis  म्हणाले.

Read More : 

भिडेंच्या वक्तव्याची चौकशी करुन कारवाई करणार, जयंत पाटलांचा इशारा

जयंत पाटलांनी घेतला संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा समाचार, सर्वत्र जोरदार चर्चा

सचिन वाझे प्रकरणावरुनही उदयनराजे आक्रमक, म्हणाले, ‘हा कोण वाझे…’

संजय राऊतांनी फडणवीसांना दिला सल्ला, म्हणाले – ‘प्रसंग बाका, सरकार कोणाचं हे पाहू नका, दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्या’

15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात

Balasaheb Thorat : ‘राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्व देत नाही’

राज्यात 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण Lockdown ? मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर
होऊ शकतो निर्णय

खा. विनायक राऊतांचा राणेंवर ‘निशाणा’, म्हणाले – ‘कोकण सम्राटां’ नी चिपी विमानतळाचं कंत्राट दळभद्री कंपनीला देऊन वाट लावली

Related Posts