IMPIMP

राज ठाकरे म्हणाले – ‘मी मास्क लावतंच नाही’, मंत्री विजय वडेट्टीवार म्हणतात…

by sikandershaikh
raj-thackeray-vijay-wadettiwar

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)मराठी भाषा दिनानिमित्त (Marathi Language Day) मनसेच्या (Maharashtra Navnirman Sena – MNS) वतीनं मराठी स्वाक्षरी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र कोरोना (COVID-19) च्या वाढत्या प्रादुर्भावामुळं राज्य सरकारनं मनसेच्या कार्यक्रमांना गर्दी नाकारली होती. शिवाजी पार्क येथे मनसेनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मास्क लावला नव्हता. यानंतर राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा झाली. तुम्ही मास्क का लावला नाहीत असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर मी मास्क लावतंच नाही, तुम्हाला सांगतोय असं म्हणत राज ठाकरेंनी काढता पाय घेतला. यावर आता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे. नागपूरमध्ये बोलताना त्यांनी यावर आपलं मत मांडलं.

‘आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता’

राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मास्क लावला नव्हता म्हणून अनेक काँग्रेस नेत्यांनी काळजी व्यक्त केली होती दरम्यान विजय वडेट्टीवार याबाबत बोलताना म्हणाले, राज ठाकरे हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता आहे. आम्ही त्यांना विनंती करतो की, त्यांनी मास्क लावावा असंही वडेट्टीवार म्हणाले.

‘त्यांना कोरोना झाला तर राज्य सरकार जबाबदार नसेल’

पुढं बोलताना वडेट्टीवार म्हणतात, जर ते आमच्या विनंतीला मान देणार नसतील आणि मास्क लावणार
नसतील आणि भविष्यात त्यांना कोरोना झाला तर राज्य सरकार जबाबदार नसेल असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान कोरोना (COVID-19) च्या वाढत्या प्रादुर्भावामुळं राज्य सरकारनं मनसेच्या कार्यक्रमांना गर्दी नाकारली.
यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
मंत्री गर्दी करून धुडगूस घालतोय आणि शिव जयंती, मराठी भाषा दिनाला सरकार नकार देत आहे.
कोरोनाचं संकट येतंय असं वाटत असेल तर निवडणुकाही पुढं ढकलाव्यात असं ठाकरे म्हणाले होते.

‘तुझा नवरा अडकणार नाही असं त्यावेळी पवार साहेब म्हणाले होते’ : चित्रा वाघ

Related Posts