IMPIMP

BG Kolse Patil : ‘त्यावेळी संभाजी छत्रपतींनी संसदेत तोंड का उघडले नाही?’

by nagesh
why were you silent at that time in parliament b g kolse patil asked to sambhaji chhatrapati

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द ठरवला. यावरून राज्यात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. आरक्षणाच्या मुद्यावरून भाजप राज्यसभेचे खासदार संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांनी कालच पत्रकार परिषद घेत राज्य सरकारपुढे ५ मागण्या आणि ३ पर्याय ठेवले आहेत. तर आता खा. संभाजी छत्रपती यांच्यावर माजी न्यायामूर्ती बी. जी. B.G. कोळसे-पाटील यांनी टीका करत थेट सवाल देखील केला आहे.

‘ती फाईल कोणत्या भुतांनी पळवली, याचा खुलासा करावा’; शिवसेनेची राज्यपालांवर टीका

कोळसे-पाटील म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं. मराठा समाजाला आरक्षण देणं हे सर्वस्वी केंद्र सरकारच्या हातात आहे, असं सांगतानाच ज्यावेळी संसदेत १०२ वी घटना दुरुस्ती करण्यात आली. त्यावेळी संभाजीराजे संसदेत होते, मग त्यांनी तोंड का उघडले नाही?, असा थेट सवाल कोळसे-पाटील B.G. यांनी खा. संभाजी छत्रपती sambhaji chhatrapati यांच्यावर केला आहे. पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणावरून केवळ राजकीय खेळी खेळली जात आहे. संभाजीराजे ज्या मागण्या केल्याच सांगत आहेत, त्यातून फक्त मराठ्यांच्या नावाने राजकारण केलं जात आहे. अशा शब्दात आरोप कोळसे-पाटील B.G. यांनी केलाय.

Atul Bhatkhalkar : ‘राज्यपालांना विमानातून उतरवणार्‍या सत्ताधार्‍यांनी राज्यघटना शिकवू नये’

काय आहेत संभाजीराजेंचे ३ पर्याय ?
खा. संभाजी छत्रपती sambhaji chhatrapati यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान, राज्य सरकारने तात्काळ रिव्ह्यू पिटीशन दाखल करावी. हा राज्य सरकारचाच विषय आहे, रिव्ह्यू पिटीशन टिकलं नाही तर क्युरिटिव्ह पिटीशन दाखल करावी. हा शेवटचा पर्याय आहे. परंतु, हा पर्याय अपवादात्मक आहे. त्यासाठी भक्कम पुरावे घेऊनच न्यायालयात जावं लागणार आहे. आणि ‘३४२ अ’ च्याद्वारे आपण प्रपोजल केंद्राकडे देऊ शकतो. राज्यपालांच्या माध्यमातून ते राष्ट्रपतींकडे जाणार. राष्ट्रपतींना योग्य वाटलं तर ते केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे देतील. त्यांना योग्य वाटलं तर ते संसदेकडे पाठवतील.

Also Read :

उद्धव ठाकरेच Best CM ! ‘कोरोना’ची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती

Tiger 3 मध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार पाकिस्तानी एजंटची भूमिका

Video : जालन्यात भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍याला पोलिसांकडून बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानं प्रचंड खळबळ

Related Posts