IMPIMP

Ajit Pawar | ‘केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीस दोघेही हजर होते मग आत्ता गप्प का?’ अजित पवारांचा शिंदे – फडणवीस सरकारला सवाल…

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar question eknath shinde and devendra fadnavis over maharashtra karnatak dispute

सरकारसत्ता ऑनलाईन  – काही दिवसांपूर्वी सीमा प्रश्नावर कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली होती. तरीदेखील सीमावर्ती भागात कर्नाटककडून मराठी नेत्यांची धरपकड सुरू असून त्यावर राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे – फडणवीस सरकारला फटकारले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कर्नाटक विधानसभेचे देखील अधिवेशन बेळगाव येथे सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीने व्हॅक्सीन मैदानावर एक मेळावा आयोजीत करण्याचे ठरवले होते. पण या मेळाव्यास पोलिसांनी परवानगी नाकारली असून कर्नाटकात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तसेच येथील मराठी नेत्यांना अटक करणयात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे – फडणवीस सरकारला फटकारले आहे.

 

नागपूर येथे बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. त्या बैठकीमध्ये कुणीही एकमेकांच्या राज्यात जाण्यास अडवणूक करायची नाही, असे ठरले होते. खासदार धैर्यशील माने यांना देखील कर्नाटकात येऊ नये म्हणून सांगितलं गेलं. बेळगावात मराठी नेत्यांची धरपकड सुरू झाली आहे.’ असे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे यावेळी बोलताना म्हणाले.

 

सीमाप्रश्नावर पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, ‘महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर सांगायचे सामंज्यस्याची भूमिका घेऊ.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्वांनाच मान्य करावा लागणार आहे.
मात्र बेळगावात मराठी लोकांची धरपकड सुरू करायची. तिथले मुख्यमंत्री वेगळी भूमिका घेताना दिसत आहेत.
गृहमंत्र्यांसमोर झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही उपस्थित होते.
मात्र गृहमंत्र्यांसमोर ठरलेलं कोण मोडत आहे, हे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगितले पाहिजे.
तसेच त्यापुढची कारवाई काय केली जाणार, हे सुध्दा समजलं पाहिजे.’
असेही अजित पवार (Ajit Pawar) यावेळी बोलताना म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar question eknath shinde and devendra fadnavis over maharashtra karnatak dispute

 

हे देखील वाचा :

Pune News | शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा संपन्न

Pune News | ‘सोनीस’ यांना सागा स्टार पारितोषिक प्रदान!

FIFA World Cup 2022 | मेस्सीने फायनलमध्ये रचला इतिहास; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फुटबॉलपटू

Amruta Deshmukh | विकास सावंत पाठोपाठ अमृता देशमुखचीही बिग बॉसच्या घरातून एक्झिट

 

Related Posts