IMPIMP

Baramati Lok Sabha – Vijay Shivtare | विजय शिवतारे बारामतीमधून अपक्ष लढणार ! अर्ज भरण्याची तारीख केली जाहीर, महायुतीमधील वाद उफाळण्याची चिन्हे

by sachinsitapure

पुणे : Baramati Lok Sabha – Vijay Shivtare | महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे हे बारामती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. आज शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधी घोषणा केली. शिवतारे यांच्या उमेदवारीमुळे अजित पवार गट (Ajit Pawar NCP) अडचणीत येणार आहे. यामुळे एकुणच महायुतीमधील अंतर्गत वाद उफाळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आजच्या पत्रकार परिषदेत विजय शिवतारे म्हणाले, बारामती लोकसभा मतदारसंघातून पवार कुटुबियांची हुकूमशाही संपविण्यासाठीचे माझे हे धर्मयुद्ध आहे. त्यामुळे आता निवडणुकीतून माघार नाही. मी येत्या १२ एप्रिल रोजी निवडणुकीचा अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार आहे.

विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांना शह देण्यासाठी निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यापासून ते सातत्याने पवार यांच्यावर कठोर टीका करत आहेत. अजित पवार यांनी याबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीदेखील विजय शिवतारे यांना शांत राहण्याची विनंती केली होती. मात्र, शिवतारे यांचा अजित पवारांना विरोध आणखी वाढल्याचे दिसत आहे.

बारामती कोणाचा सातबारा नाही, असे म्हणत शिवतारे यांनी अजित पवारांना खुले आव्हान दिले आहे. आज तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन १२ एप्रिलला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले असल्याने अजित पवार यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवतारे यांनी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याचे सत्र देखील एकीकडे सुरू ठेवले आहे. नुकतीच त्यांनी काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे (Anantrao Thopte) यांचीही भेट घेतली होती. एकुणच शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांच्या संभाव्य उमेदवारी समोर तगडे आव्हान उभे करण्याचा जोरदार प्रयत्न चालवला आहे.

Devendra Fadnavis Meet Raj Thackeray | राज ठाकरे-फडणवीसांची मध्यरात्री भेट, माहिती देताना उपमुख्यमंत्री म्हणाले…

Related Posts