IMPIMP

Devendra Fadnavis Meet Raj Thackeray | राज ठाकरे-फडणवीसांची मध्यरात्री भेट, माहिती देताना उपमुख्यमंत्री म्हणाले…

by sachinsitapure

मुंबई : – Devendra Fadnavis Meet Raj Thackeray | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीत भाजपा नेते गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) महायुतीसोबत (Mahayuti) जाण्याची भूमिका जाहीर करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ठाकरे हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील आणि नंतर आपली पुढील भूमिका जाहीर करतील असे सांगण्यात आले. त्यानुसार काल मध्यरात्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीबाबत फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.(Devendra Fadnavis Meet Raj Thackeray)

राज ठाकरे यांच्या मध्यरात्रीच्या भेटीबाबत आज सकाळी प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी कोणतीही माहिती देण्याचे टाळले आहे. तुम्ही रात्री उशिरा राज ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे, या भेटीत काय बोलणे झाले? असे विचारले असता फडणवीस म्हणाले, आमची भेट रात्री उशिरा झाली की लवकर झाली या भानगडीत तुम्ही का पडता? तुम्ही फार त्या भानगडीत पडू नका. अशा भेटी होत असतात. यात नवीन काय आहे?

दरम्यान, अमित शाह यांच्या भेटीनंतर राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.
महायुतीकडून मनसेला एक किंवा दोन लोकसभेच्या जागा मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
मनसे महायुतीत सहभागी झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण पाहायला मिळू शकते.

Pune Koregaon Park Crime | सिगारेट घेण्यावरुन तरुणाला मारहाण, सहा जणांना अटक; कोरेगाव पार्क परिसरातील घटना

Related Posts