IMPIMP

Former President Pratibha Patil | माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आजारपणामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल

by sachinsitapure

पुणे : Former President Pratibha Patil | माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्येत बिघडल्याने तातडीने उपचारासाठी पुणे येथील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. त्यांचे वय ८९ वर्ष असून छातीत इन्फेक्शन आहे. त्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत.

काही दिवसांपासून पाटील यांची प्रकृती खराब आहे.नाहीये. बुधवारी अधिकच अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबियांना त्यांना रुग्णालयात दाखल केले. राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर पुणे येथे स्थायिक झाल्या आहेत. राजकारणात आणि समाजकारणात पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येक महिलेपुढे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा आदर्श आहे.

कायदेतज्ज्ञ असलेल्या प्रतिभाताई जळगाव विधानसभा मतदार संघातून निवडून आल्या होत्या. नंतर त्या एस.टी. महामंडळाच्या अध्यक्षा झाल्या. पहिल्यांदाच मंत्री आणि त्यानंतर सतत २० वर्षे त्यांनी निरनिराळ्या खात्याची मंत्रीपदे सांभाळली. त्यांनी देविसिंह शेखावत यांच्याशी विवाह केला होता. १९९१ साली त्या अमरावतीतून लोकसभा सदस्य झाल्या. त्यानंतर त्यांची राष्ट्रपती पदावर निवड झाली.

Merged Villages In PMC | पुणे महानगरपालिकेत नव्याने सामाविष्ट 34 गावांचा वाढीव तीनपट ते दहापट मिळकतकर कमी करण्याची कार्यवाही तात्काळ करा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मंत्रालयात आयोजित बैठकीत निर्देश

Related Posts