IMPIMP

Maratha Kranti Morcha | मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत नीरज चोप्राचा सत्कार करण्याचा ठराव

by nagesh
Maratha Kranti Morcha | resolution to felicitate neeraj chopra in the meeting of maratha kranti morcha

पुणे न्यूज (Pune News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)–   Maratha Kranti Morcha | आज पुण्यात (Pune) खासदार छत्रपती संभाजारीजे (MP Chhatrapati Sambhaji Raje) यांच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती मोर्चाची (Maratha Kranti Morcha) बैठक आयोजित करण्यात आली आहे. पुण्यात या बैठकीला प्रारंभ झाला आहे. या बैठकी दरम्यान भारताचा इतिहास घडवलेला स्टार खेळाडू नीरज चोप्राचा सत्कार करण्याचा ठराव मांडण्यात आला आहे. इंडियन प्लेयर नीरज चोप्राने (Neeraj Chopra) टोकियोमध्ये (Tokyo) झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भरीव कामगिरी करत गोल्ड मेडल (Gold medal) संपादन केलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

प्रामुख्याने पाणीपत लढाईसाठी गेलेल्या मराठा समाजाच्या वंशजांना आज नीरज चोप्राला ‘रोड मराठा’ म्हणून ओळखल्या जाते.
अश्या हरयाणा स्थित मराठा समाजात जन्मलेल्या नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने अभिनंदन,” असे फलक बैठकीत लावण्यात आले.
तर, महाराष्ट्र राज्य सरकारने नीरज चोप्राचा सत्कार करावा, अशी मागणी केली.
पुण्यात सुरु असलेल्या मराठा क्रांती मोर्चाची बैठकी दरम्यान अशी मागणी करण्यात आली आहे.

 

दरम्यान, या अगोदर नीरजने आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई खेळ आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली आहेत.
नीरज चोप्राने आपले भालाफेक कौशल्य सुधारण्यासाठी जर्मनीच्या बायोमेकॅनिक्स तज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे.
तेव्हापासून त्याच्या कामगिरीत सातत्य राहिले आहे. तर, यंदा नीरजने भालाफेक स्पर्धेत अंतिम फेरी
पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे.

 

 

Web Title : Maratha Kranti Morcha | resolution to felicitate neeraj chopra in the meeting of maratha kranti morcha

 

हे देखील वाचा :

Builder Avinash Bhosale | प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना ईडीचा आणखी एक दणका, 4 कोटींची मालमत्ता जप्त

Pimpri Crime | पिंपरीत आढळला ब्रिटिश कालीन ‘बॉम्ब’, परिसरात खळबळ

MLA Abu Azmi | वाढदिवसानिमित्त काढली भव्य मिरवणूक; अबू आझमींसह अन्य कार्यकर्त्यांवर FIR दाखल

 

Related Posts